Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित शर्माला मोठा झटका, आयसीसीने जाहीर केली टीम ऑफ टुर्नामेंट; कर्णधार केलं सॅटनरला, वाचा काय झालं.

आयसीसी प्रत्येक स्पर्धेनंतर सर्वोत्तम 11 किंवा 12 खेळाडूंची नावं जाहीर करते. आयसीसीने आताही तसंच केल. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 12 खेळाडूंचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये समावेश केला. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली. आश्चर्यकारक म्हणजे या 12 खेळाडूंमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा समावेश करण्यात आलेला नाही.

ICC Team of the Tournament announced

रोहित शर्माला डच्चू

आयसीसीने जाहीर केलेल्या या टीम ऑफ टुर्नामेंटमध्ये एकूण १२ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. परंतु त्या संघाचा कर्णधार म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅटरन याला ठेवण्यात आलं आहे. या खेळाडून टीम इंडियाचे तब्बल सहा खेळाडू आहेत. मात्र कर्णधार रोहित शर्माला या संघात स्थान मिळवता आलेले नाही. याबद्दल सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

टीम इंडियाचं सलग दुसरं यश

भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कपनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला. टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचं योगदान देत विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितने 83 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. रोहितने कर्णधारपदाला आणि त्याच्या लौकीकाला साजेशी अशी खेळी केली.

टीम इंडियाचे 6 खेळाडू कोण?

आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघात 12 पैकी 6 भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांची निवड केली आहे. तर उपविजेत्या न्यूझीलंडकडून रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी आणि मिचेल सँटनर यांना संधी देण्यात आली आहे. सँटनरकडे या संघांचं कर्णधारपद आहे. तर इब्राहिम झाद्रान आणि अजमतुल्लाह ओमरजई अफगाणिस्तानच्या या दोघांची निवड करण्यात आली आहे.

कशी आहे संपूर्ण टीम

रचीन रवींद्र, इब्राहिम झाद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अजमतुल्लाह ओमरजई, मिचेल सँटनर (कॅप्टन), मोहम्मद शमी, मॅट हेनरी आणि वरुण चक्रवर्ती. अक्षर पटेल (12वा खेळाडू)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+