Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हरियाणा स्टिलर्सने उंचावली प्रो कबड्डीची ट्राँफी; पटणा ठरला उपविजेता, शेवटपर्यंत रंगला सामना

प्रो कबड्डी लिगच्या अकराव्या पर्वाच्या अंतिम सामन्यात हरियाना स्टिलर्सने पटना पायरेट्सचा पराभव केला. हरियाणाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र यावेळी पहिल्यांदाच प्रो कबड्डीचे विजेतेपद त्यांच्या पदरात पडले. त्यांनी हा सामना ३२-२३ अशा गुणांनी जिंकला.

Haryana Steelers

पटनाची चौथी ट्राँफी हुकली

पटना पायरेट्सने यापूर्वी तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मात्र यावेळी त्यांना हरियाणा स्टिलर्सने जिंकू दिले नाही. चौथ्या वेळेस अजिंक्य होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. देवांक आणि आयान या दोन रायडर्सच्या जोरावर पटनाने फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र अंतिम सामन्यात हरियाणाचा बचाव हे दोघेही भेदू शकले नाहीत. शेवटच्या सात मिनिटांत हरियाणाने दिलेला लोण पटनाला शेवटपर्यंत सावरु शकला नाही.

शिवम-विनय चमकले

हरियाणाकडून शिवम पटारे व विनयने चांगली कामगिरी केली. शिवमने ९ व विनयने ७ गणांची कमाई केली. पटनाच्या गुरुदीपच्या हायफाईव्ह खेरीज पटनाची बचावफळी फारशी चमकदार कामगिरी करु शकली नाही. चढाईचे सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पटणाच्या देवांकने एका हंगामात गुणांचे त्रिशतक केले. मात्र त्याला गुणांच्या पुढे जाता आले नाही. आयानही केवळ तीन गुणच मिळवू शकला.

किती मिळाले बक्षिस

शेवटच्या सात मिनिटांत मिळालेल्या लोणमुळे पटनावर दडपण वाढले. आणि शेवटच्या सात मिनिटांत पटणाला फक्त पाच गुण मिळवता आले. स्पर्धेच्या विजेच्या हरियाणा संघाला करंडक व तीन कोटींचे बक्षिस मिळाले. उपविजेच्या पटणा पाटरेट्स संघाला करंडक व एक कोटी आठ लाख रुपये मिळाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+