Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईच्या विजयापेक्षा हार्दिक-जस्मिनच्या अफेयरचीच जास्त चर्चा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Hardik Pandya and Jasmin Walia: नताशा स्टॅन्कोविचशी घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन जोडीदार मिळल्याच्या बातम्या अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता हार्दिक पांड्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले जात आहे. मात्र हार्दिक पंड्याच्या बाजूने अजून तरी असं काहीही दिसले नाही.

मुंबई इंडियन्सने केकेआरविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. वानखेडेवर केकेआरचा मुंबईने कोलकात्याचा 8 गडी राखून पराभव केला. गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर मुंबईने विजयाचे खातेही उघडले आहे. संघाने मोठ्या उत्साहात आनंद साजरा केला पण विजयापेक्षाही हार्दिक पंड्याच्या अफेअरची चर्चा जास्त पाहायला मिळत आहे.

hardik pandya rumored girlfriend

सामना पाहिल्यानंतर जास्मिन परत जाताना दिसली. असं म्हटलं जात आहे की, जास्मिन वालिया टीम बसकडे जात होती. जरी याची पुष्टी झालेली नसली तरी स्टेडियममधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात विशेष म्हणजे सामना पाहून बाहेर पडणारे लोक व्हीआयपी आहेत. जास्मिन वालियाला व्हीआयपी पास देऊन सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र जेव्हा जास्मिन वालिया टीम बसमध्ये बसलेली दिसली. त्यावेळी चाहत्यांनी व्यक्त केलेल्या शंका आता स्पष्ट होताना दिसत आहेत.

हार्दिकच्या जास्मिनसोबतच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. पण मुंबईच्या विजयानंतर जस्मिन संघाच्या बसमध्ये चढली तेव्हा हार्दिक आणि जास्मिन यांच्यात काही तरी नाते असल्याचे आता बोललं जात आहे. खेळाडूच्या बसमध्ये फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच संघ बसमध्ये बसण्याची परवानगी असते.मात्र जस्मिन बसमध्ये चढताच चाहत्यांच्या शंका खऱ्या ठरल्या आहेत.

कोण आहे जास्मिन वालिया ?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. संगीत क्षेत्रात तिची खूप चर्चा आहे. इंस्टाग्रामवरही त्याचे चांगले फॅन फॉलोइंग आहे. जास्मिन अनेक मोठ्या ब्रँड्सची जाहिरात देखील करते. जास्मिनचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील आहे. जास्मिन हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषांमध्ये गाणी गाते. जास्मिनच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी रुपये आहे. जास्मिनचा जन्म लंडनमध्ये झाला आहे, पण तिचे पालक भारतातील आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+