hardik pandya : हार्दिक पांड्याच्या आयुष्यात पुन्हा वादळ; घटस्फोटानंतर प्रेयसीनेही साथ सुटली?
Hardik pandya breakup jasmin walia : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात पुन्हा एकदा दुःखद घटना घडल्याची चर्चा सुरू आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविच हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आता त्याची कथित प्रेयसी जास्मिन वालिया हिनेही त्याची साथ सोडल्याच्या बातम्यांनी क्रीडा आणि मनोरंजन वर्तुळात खळबळ उडवली आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना 'अनफॉलो' केल्याने या चर्चांना बळ मिळालं आहे.

नताशासोबतचा घटस्फोट आणि त्यानंतरचे नातेसंबंध
गेल्या वर्षी हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविच यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर विभक्त झाल्याची घोषणा केली होती. नताशाने इन्स्टाग्रामवर स्पष्ट केलं होतं की ते "परस्पर संमतीने वेगळे होत आहेत." मात्र, आपला मुलगा अगस्त्य हीच तिची पहिली प्राथमिकता असेल असंही तिने नमूद केलं होतं आणि मुलाच्या चांगल्या संगोपनासाठी दोघे एकत्र काम करत राहतील असंही सांगितलं होतं.
नताशासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांनंतर लगेचच हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्यातील नात्याची चर्चा सुरू झाली. मात्र, दोघांनीही कधीही सार्वजनिकरित्या आपलं नातं स्वीकारलं नव्हतं.
हार्दिक आणि जास्मिनच्या नात्याची चर्चा कशी सुरू झाली?
हार्दिक आणि जास्मिन यांच्यातील नात्याची चर्चा तेव्हा वाढली, जेव्हा दोघांनी ग्रीसच्या एका रोमँटिक ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर ते अनेकदा एकत्र दिसू लागले. जास्मिन हार्दिकच्या क्रिकेट सामन्यांमध्ये आणि मुंबई इंडियन्स संघाच्या बसमध्येही सातत्याने दिसली. यातूनच त्यांच्या नात्याबद्दलच्या बातम्या वेगाने पसरल्या.
जास्मिन दुबईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यातही उपस्थित होती. त्यावेळी ती स्टँडमध्ये तिच्या कथित प्रियकराचा जयजयकार करताना दिसली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा अधिकच वाढली.
इन्स्टाग्रामवरील 'अनफॉलो'ने ब्रेकअपची चर्चा
नुकतंच एका रेडिट वापरकर्त्याने याबद्दल प्रश्न विचारला, "हार्दिक पंड्या आणि जास्मिन वालिया यांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे का? मी अलीकडेच पाहिले की त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. काय चालले आहे?" या प्रश्नानंतरच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना सुरुवात झाली. इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करणे हे अनेकदा नातेसंबंध संपल्याचे संकेत मानले जाते.
कोण आहे जास्मिन वालिया?
जास्मिन वालिया ही इंग्लंडमधील एसेक्स येथे भारतीय वंशाच्या पालकांच्या घरी जन्माला आली आहे. तिने 2010 मध्ये ब्रिटिश रिॲलिटी टीव्ही मालिका 'द ओन्ली वे इज एसेक्स' (TOWIE) मध्ये अतिरिक्त कलाकार म्हणून पदार्पण केले. 2012 पर्यंत ती या शोची पूर्ण कलाकार सदस्य बनली होती, ज्यामुळे तिला ब्रिटनमध्ये चांगलीच ओळख मिळाली.
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ येणाऱ्या या घडामोडींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. वैयक्तिक जीवनातील या चढ-उतारांचा त्याच्या खेळावर काही परिणाम होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications