हार्दिक पंड्या गर्लफ्रेंड महिकासोबत पूजेत लीन; रोमॅंटिक Videoमध्ये चुंबनही घेतले, टीम इंडियातून आऊट!
Hardik Pandya Girlfriend Mahika News : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे टीम इंडियापासून बाहेर असला तरी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. २६ सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत जखमी झाल्यापासून विश्रांती घेत असलेल्या हार्दिकने नुकतेच त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतचे काही खासगी क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये दोघे पारंपरिक वेशभूषेत पूजा करताना आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

पारंपारिक वेशभूषेत हनुमान पूजा
हार्दिक पंड्याने मंगळवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर महिका शर्मासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओमध्ये हे दोघे एकत्र भगवान हनुमानाची पूजा करताना दिसत आहेत. हार्दिक आणि महिकाने पारंपारिक हिंदू विधीनुसार ही पूजा केली. पूजेदरम्यान, हार्दिक पंड्याने मरून रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते, तर महिका शर्माने सलवार-कुर्ता घातला होता. या दोघांनी हवन विधी देखील केला. तसेच, पूजेदरम्यान हात जोडून हनुमान चालीसा वाचल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
चुंबन घेतलेला रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
पूजेच्या व्हिडिओसोबतच हार्दिकने शेअर केलेल्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो आणि महिका पारंपारिक पोशाखात खूप रोमँटिक मूडमध्ये पोज देताना दिसत आहेत.
याच व्हिडिओमध्ये हार्दिक महिकाच्या गालावर प्रेमपूर्वक चुंबन घेताना दिसला. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर त्यांच्या खास नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वीही हार्दिकने महिका शर्मासोबतच्या त्यांच्या व्हेकेशनचे आणि खासगी क्षणांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांना मिठी मारताना, बीचवर मजा करताना आणि लाँग ड्राईव्हवर एन्जॉय करताना दिसले होते.
नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट
हार्दिक पंड्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने याच वर्षी (२०२४) सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकपासून घटस्फोट घेतला. हार्दिक आणि नताशा २०२० मध्ये कोविड-१९ लॉकडाऊन दरम्यान भेटले आणि त्याच वर्षी त्यांनी गुप्तपणे लग्न केले होते. त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म ३० जुलै २०२० रोजी झाला. जुलै २०२४ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सध्या हार्दिक आणि नताशा एकत्र येऊन त्यांचा मुलगा अगस्त्यचे संगोपन करत आहेत.
आशिया चषकात दुखापत, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पुनरागमन?
हार्दिक पंड्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झाल्यास, तो सध्या दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर आहे. २६ सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान त्याला डाव्या मांडीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नाही.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. निवडकर्त्यांनी अद्याप संघाची घोषणा केलेली नसली तरी, हार्दिक पंड्या या मालिकेदरम्यान टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications