Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Suryakumar Yadav Birthday: टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव 34 वर्षांचा झाला,T20 मध्ये अनेक विक्रम

Happy Birthday Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादव ज्यांला प्रेमाने 'SKY' म्हणून ओळखले जातं. तो क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे. खासकरुन T20 फॉरमॅटमध्ये. मुंबईतील स्थानिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय मैदानापर्यंतचा त्याचा प्रवास निर्धार आणि प्रतिभेने भरलेला आहे. आज (14 सप्टेंबर) मिस्टर 360° चा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्या काही खास विक्रमावर एक नजर टाकूया.

आक्रमक खेळाच्या स्टाईलमुळे वेगळी ओळख

मुंबईत आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सूर्यकुमारचा जन्म 14 सप्टेंबर 1990 रोजी झाला. या क्रिकेटपटूने आपल्या आक्रमक खेळण्याच्या शैलीच्या जोरावर लवकरच एक वेगळी ओळख निर्माण केली. मैदानावार चौफेर शॉट्स खेळण्याच्या त्याच्या खास कौशल्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. 2018 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) मध्ये जाण्याची त्याची वाटचाल एक टर्निंग पॉइंट ठरली, म्हणजे मधल्या फळीतील महत्त्वाच्या खेळाडूच्या स्थानावर त्याचे स्थान मजबूत झाले.

suryakumar yadav

सूर्यकुमार यादव आज 34 वर्षांचा झाला

सूर्यकुमार यादव आज 34 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी वेळोवेळी सूर्याकुमार यादवने दबावाखाली केलेली चांगली कामगिरी आणि सामना जिंकून देण्याच्या क्षमतेचं कौतूक केलेलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेतून पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताकडून पदार्पण करण्यासाठी सूर्यकुमारला मार्च 2021 पर्यंत वाट पाहावी लागली. तेव्हापासून तो या फॉरमॅटमधील महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 2022 च्या ICC T20 विश्वचषकादरम्यान त्याने 59.75 च्या सरासरीने आणि 189.68 च्या स्ट्राइक रेटने 239 धावा केल्या.

सूर्यकुमार यादवची प्रभावी कारकीर्द

विश्वचषकानंतरच्या काही महिन्यांत सूर्यकुमार एक अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला. मैदानाभोवती चौफेर फटके खेळण्यात माहीर असलेल्या सुर्यकुमार एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देतो. त्याने भारताच्या T20 संघात आपले स्थान कायम राखले आहे. तसेच विविध फॉरमॅटमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे.

सूर्यकुमारची T20 कामगिरी

सूर्याने 71 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 42.66 च्या सरासरीने 2432 धावा केल्या आहेत. त्याच्या प्रभावी रेकॉर्डमध्ये 168.65 च्या स्ट्राइक रेटसह चार शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. 2022 मध्ये त्याने 31 T20 सामन्यांमध्ये 1164 धावा केल्या, ज्यामुळे तो एका कॅलेंडर वर्षात T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हजाराहून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला.

सर्वाधिक शतके करणारा तिसरा फलंदाज

रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेलसह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतके झळकावणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये सुर्याचे ही नाव आहे. याशिवाय त्याने श्रीलंका दौऱ्यात दोन विकेट घेत बॉलिंगमध्ये ही योगदान दिले आहे. याशिवाय सूर्याच्या नावावर T20I मध्ये सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार (16 वेळा) जिंकण्याचा विक्रमही आहे. सूर्याने 71 सामन्यांमध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला आहे, या यादीत विरनदीप सिंग (84 सामने 16 वेळा) दुसऱ्या स्थानावर आणि सिकंदर रझा (91 सामने 15 वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे.

एकदिवसीय आणि कसोटी कामगिरी

T20 क्रिकेटमध्ये यश मिळवूनही सूर्यकुमारची एकदिवसीय कामगिरी तितकी उल्लेखनीय ठरली नाही. त्याने 37 सामन्यात 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहेत. ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फक्त एकच सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्याने आठ धावा केल्या आहेत.

सूर्याच्या एका अविस्मरणीय झेलने जिंकला वर्ल्ड कप

2024 च्या T20 विश्वचषकादरम्यान सुर्याने घेतलेल्या अविस्मरणीय झेलने भारताला T20 विश्वचषक जिंकून दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरच्या झेलमुळे 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+