Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' क्रिकेटपटूचा झाला होता विमान अपघातात मृत्यू! कर्णधार म्हणून ग्रेट पण लागला कारकिर्दीला डाग

Former SA captain Hansie Cronje died in plane crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी १२ जून रोजी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमध्ये टेकऑफ केल्यानंतर दोन मिनिटांतच कोसळले. हे विमान २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जात होते, त्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. एकमात्र प्रवासी या अपघातातून वाचला आहे.

हे अपघातग्रस्त विमान शहरातील सिव्हिल हॉस्पिटलजवळील एका इमारतीवर आदळले, ज्यामध्ये डॉक्टर राहत होते. या अपघातात काही डॉक्टर आणि इतरही जखमी झाले. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जून रोजी घटनास्थळी भेट दिली आणि रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेवर त्यांनी दुःख आणि आपल्या संवेदना व्यक्त करत अकल्पित घटना असल्याचे म्हटले आहे. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे. अजूनही अनेक मृतदेहांची ओळख पटवली जात आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

Former SA captain Hansie Cronje died in plane crash

२३ वर्षांपूर्वी झालेल्या एका विमान अपघाताची आठवण

अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेने पुन्हा एकदा २३ वर्षांपूर्वी झालेल्या एका विमान अपघाताची आठवण झाली आहे. या घटनेत एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाला होता. तो काही साधा सुधा खेळाडू नव्हता तर दिग्गज आणि तेव्हा खूपच बलाढ्य समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलीयन संघाला पाणी पाजत होता. या क्रिकेटपटूने दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपदही भूषवले आहे. २००२ मध्ये हॅन्सी क्रोन्जे यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यावेळी तो फक्त ३२ वर्षांचा होता. तो एका चार्टर कार्गो विमानातून प्रवास करत होतो, जे खराब हवामानामुळे दक्षिण आफ्रिकेच्या ओटेनिका पर्वतांमध्ये कोसळले. या अपघातात क्रोन्जेसह सर्वांचा मृत्यू झाला.

कसोटीत मोठी कामगिरी

हॅन्सी क्रोन्जे यांनी कसोटी क्रिकेटमध्ये छाप सोडली. क्रोन्जे हे क्रिकेट जगतात एक मोठे नाव होते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा कर्णधार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ते जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक बनले.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ५३ पैकी २७ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे नेतृत्व केले. तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता आणि फिरकी गोलंदाजही...

का झाली क्रोन्जेची कारकिर्द उद्धवस्त

उमद्या वयात आफ्रिकन संघाचा कर्णधार झालेला हॅन्सी क्रोन्जे २००० मध्ये त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला. त्याने "किंग्स कमिशन" समोर कबूल केले की तो मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी होता. या कबुलीजबाबानंतर त्याला आजीवन क्रिकेटमधून बंदी घालण्यात आली होती. या घटनेनंतर त्याची कारकीर्द संपली पण त्याची प्रतिमाही खराब झाली. क्रिकेटमधून बंदी घालण्यात आल्यानंतरही त्याने हार मानली नाही. त्याने एका कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम सुरू केले. परंतु नशिबाने त्याला पुन्हा एक मोठा धक्का दिला. ३१ मे २००२ रोजी एका महत्त्वाच्या बैठकीमुळे त्याची नियोजित उड्डाण चुकली. त्यानंतर, त्याने एक छोटे चार्टर विमान घेतले, जे दुसऱ्या दिवशी सकाळी क्रॅश झाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+