Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy 2025 : बुमराह एक-दोन दिवसांत दिसेल मैदानावर; चॅम्पियन ट्राँफीसाठी अपेक्षा वाढल्या?

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सहभाग नोंदवला. तेथे त्याच्या पाठीचे अनेकदा स्कॅन करण्यात आले. आता येत्या एक-दोन दिवसांत तो सराव सुरु करेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. असे झाले तर भारताचा हा वेगवान गोलंदाज आगामी चॅम्पियन ट्राँफीसाठी भारतीय संघात दिसेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Jasprit Bumrah

काय झाले होते?

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिडनी कसोटीत पाठीला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वरुण चक्रवर्तीला संधी मिळाल्यावर त्याला वगळण्यात आले होते. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराहच्या उपलब्धतेबद्दल उत्सुकता वाढत आहे.

बीसीसीआयचा प्रयत्न सुरु

चॅम्पियन ट्राँफीसारख्या मोठ्या स्पर्धेत बुमराहने खेळावे यासाठी बीसीसीआयकडूनच प्रयत्न सुरु आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये सामील होण्यासाठी बेंगळुरूला गेला होता. तेथे त्याच्या पाठीच्या दुखापतीची तपासणी करण्यासाठी स्कॅन करण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ सादर करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी आहे आणि बीसीसीआय बुमराहला स्पर्धेत समाविष्ट करण्यासाठी ती आणखी वाढवण्याची योजना आखत असल्याचेही सांगितले जात आहे.

बुमराह कायम राहणार

उद्या म्हणजेच १२ फेब्रुवारीला संघाची अंतिम निवड होणार आहे. मात्र बुमराहच्या तब्बेतीत एक टक्का फरक पडला तरी, त्याची या संघातील निवड कायम ठेवली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यापूर्वी बीसीसीआयने हार्दिक पांड्यासाठीही असेच केले होते. त्यावेळी प्रसिद्ध कृष्णाला त्याचा बदली म्हणून आणण्यापूर्वी बीसीसीआयने जवळजवळ दोन आठवडे वाट पाहिली होती. शुभमन गिल डेंग्यूने ग्रस्त होता, तेव्हाही त्याच्या बदलीचा विचार केला गेला नव्हता. आता बुमराहबाबतही बीसीसीआय दुसरा पर्याय निवडणार नाही, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+