Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ENG vs SA Head to Head : इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड घ्या जाणून

ENG vs SA Head to Head : आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या 11 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुध्द इंग्लंड यांच्यात आज (ता.1 मार्च) रोजी सामना होईल. अफगाणिस्तान विरुध्द 8 धावांनी पराभव झालेल्या इंग्लंडचा संघ चॅम्पियन्स ट्रॅाफीतील शेवटच्या सामन्यात तरी विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यामुळे इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. हा सामना कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे.

इंग्लंडचा संघ दोन सामन्यात पराभव झाल्यामूळे ते चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेमधून आधीच बाहेर पडले आहेत. पण दक्षिण आफ्रिकेच्या आशा अजूनही जिवंत आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा गट ब मधून पुढील फेरीत पोहोचण्याचा सर्वात मोठा दावेदार, असल्याचं म्हटलं जातं.

england vs south africa

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. या स्पर्धेत त्यांनी त्यांचे दोन्ही सामने गमावले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने एक सामना जिंकला आहे तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी उद्याचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.

इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुध्द दक्षिण आफ्रिकेच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय 70 सामने खेळले आहेत. त्यापैकी इंग्लंड संघाने 30 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघाने 34 सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला आणि 5 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पगडा भारी राहिला आहे.

आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत 12 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यामध्ये इंग्लंडने सहा वेळा विजेतेपद जिंकले आहे आणि दक्षिण आफ्रिकेनेही तेवढ्याच वेळा विजेतेपद जिंकले आहे. जर आपण फक्त चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोललो तर इथेही दोन्ही संघांचे गुण समान आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हे दोन्ही देश चार वेळा एकमेकांसमोर आले आहेत, जिथे इंग्लंडने दोनदा विजय मिळवला आहे आणि दक्षिण आफ्रिका दोनदा विजेता ठरला आहे.

SA विरुद्ध ENG: दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

इंग्लंड: फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, मार्क वूड

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+