दुबईच्या क्राउन प्रिन्स शेख यांनी घेतली टीम इंडियाच्या खेळाडूची भेट, रोहित शर्माने दिले खास गिफ्ट
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास राहिली नाही. मुंबईने पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे तर 4 सामन्यात मोठा पराभव झाला आहे. पॉइंट टॅबलबद्दल बोलायचं झालं तर मुंबईचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल दरम्यान आयसीसी अध्यक्ष जय शाह, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याने दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद यांची भेट घेतली आहे.

रोहीत शर्माकडून दुबईच्या क्राउन प्रिन्स शेख यांना खास भेट
या भेटी दरम्यान दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान यांना रोहीत शर्माने चॅम्पियन ट्रॉफीतील भारतीय संघाची जर्सी भेट दिली आहे. याबाबत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून या बैठकीचा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मुंबईत क्रिकेटला दूरदर्शी नेतृत्वाशी जोडण्यास मदत करताना मला खूप आनंद झाला, जिथे रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह महामहिम क्राउन प्रिन्स शेख हमदान यांना भेटणे खरोखरच सन्मानाची गोष्ट होती. हे क्षण जगभरातील क्रिकेटच्या एकत्रित प्रभावाचे प्रतिबिंबित करतात.
Delighted to help connect cricket with visionary leadership in Mumbai where it was a true honour to meet His Highness @HamdanMohammed with @ImRo45, @hardikpandya7, and @surya_14kumar. These moments typify the uniting influence of cricket worldwide. pic.twitter.com/znTkXnJ22O
— Jay Shah (@JayShah) April 9, 2025
टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीचं अधिकृतपणे आयोजन हे पाकिस्तानकडे होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, त्यानंतर टीम इंडियाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भारतीय संघाला चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. रोहित शर्माने म्हटलं होते की, दुबईमध्ये खेळताना आम्हाला भारतात नसल्याचे अजिबात वाटले नाही. दुबईमध्ये भारतीयांची संख्या चांगली आहे, आणि आम्हाला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
सूर्यकुमार यादवची इंस्टा पोस्ट
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने या भेटीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये सूर्याने लिहिले की, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जय शाह यांच्यासह दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम यांना भेटून आनंद झाला. आमच्या आवडत्या कॉमन टॉपिवकर जाणून घेणे आणि त्याबद्दल बोलणे खूप आनंददायी होते.












Click it and Unblock the Notifications