धक्कादायक! मॅच खेळताना मैदानावरच क्रिकेटपटूला हॉर्ट अटॅक; अँडमिटसाठी हेलिकाँप्टर बोलावले पण...
भारतात आयपीएल २०२५ सध्या पूर्ण जोशात सुरु आहे. या स्पर्धेचा रोमांच पहिल्या तीन मॅचमध्ये दिसला. बांग्लादेशातही सध्या ढाका प्रिमिअर डिवीजन क्रिकेट लीग सुरु आहे. मात्र आता बांग्लादेशच्या याच क्रिकेट मॅचमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मॅच सुरु असतानाच एका क्रिकेटपटूला हॉर्ट अटॅक आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय झालं?
ढाका प्रिमिअर लीगमध्ये (DHL) मध्ये मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शिनेपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात सामना सुरु होता. ही मॅच 50 ओव्हर्सची होती. सामन्यादरम्यान बांग्लादेशचा खेळाडू तमीम इकबालच्या छातीती दु:खू लागले. तो फिल्डिंग करत असताना त्याला अचानक त्रास जाणवू लागला. तमीम इकबाल मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबचा खेळाडू होता. त्याला त्रास जाणवू लागल्याने मैदानात एकच धावपळ उडाली. फिल्डींग करतानाच तो मैदानावर पडला.
अँडमीटसाठी हेलिकाँप्टर बोलावले
या प्रकाराबात मॅच रेफरी देबब्रत पॉल यांनी ESPNcricinfo ला माहिती दिली. या चॅनलच्या म्हणण्यांनुसार परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन तमीम इकबालला रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागली. मात्र मैदानावर हेलिकॉप्टर उड्डाणाची व्यवस्था नसल्यामुळे त्याला हेलिकॉप्टरने नेता आलं नाही. त्यामुळे तमीमला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कोण आहे तमीम इकबाल?
तमीम इक्बाल हा बांग्लादेशचा डावखूरा प्लेअर आहे. 2023 साली त्याने बांग्लादेशसाठी आपला शेवटचा सामना खेळला होता. सध्या त्याने तिन्ही फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. बांग्लादेशसाठी तो 243 वनडे, 70 टेस्ट आणि 78 T20 सामने खेळला आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तमीम इकबालच्या 15,000 धावा केल्या आहेत.
मॅचमध्ये नेमकं काय झालं?
मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब विरुद्ध शिनेपुकुर क्रिकेट क्लबने पहिली बॅटिंग केली. 49.5 ओव्हरमध्ये त्यांची टीम 223 रन्सवर ऑलआऊट झाली. शिनेपुकुर क्रिकेट क्लबकडून कर्णधार रायन रहमानने सर्वाधिक 77 धावा केल्या होत्या. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लबसमोर 224 रन्सच आव्हान होतं. तमीम इकबाल या टीमचा स्टार फलंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications