दिनेश कार्तिक आता आरसीबीचा बॅटींग कोच आणि मेंटर असणार

मुंबई : पुढील आयपीएलचा मोसमापूर्वीच आरसीबीने आपल्या संघात बदल करण्यास सुरुवात केली आहे. दिनेश कार्तिक मागच्या मोसमात आरसीबीकडून खेळला होता पण यावेळी तसे होणार नाही. दिनेश कार्तिकने निवृत्ती जाहीर केली होती आणि आता त्याच्याकडे नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

Dnesh Karthik

आरसीबीने कार्तिकची फलंदाजी कोच म्हणून निवड केली आहे. त्याला फलंदाजी प्रशिक्षक आणि मेंटॉर बनवण्यात आले आहे. आरसीबी संघाला आयपीएलमधील यशस्वी संघ बनवण्यासाठी कार्तिकला फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.याबाबत आरसीबीने आपल्या अधिकृत एक्स सोशल मिडिया प्लेटफॉर्मवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर क्रिकेटचे संचालक म्हणाले, "डीके आमच्या कोचिंग ग्रुपमध्ये एक उत्कृष्ट जोड आहे. त्याला मैदानावर पाहणे खूप रोमांचकारी होते आणि मला खात्री आहे की, तो प्रशिक्षक म्हणूनही तितकाच प्रभावशाली असेल. एक खेळाडू म्हणून त्याची प्रदीर्घ कारकीर्द त्याचे वय आणि ट्रॅक रेकॉर्ड त्याच्या कौशल्य आणि समर्पणाबद्दल मला माहित आहे की, तो या नवीन मोसमात समान गुणवत्ता आणि वचनबद्धता आणेल."

2004 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या 39 वर्षीय खेळाडूला दोन दशकांहून अधिक काळ फलंदाजीचा अनुभव आहे. या काळात त्याने 26 कसोटी, 94 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्याने 257 आयपीएल सामन्यामध्ये 22 अर्धशतकांसह एकूण 4842 धावा केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+