'या' भारतीय माजी क्रिकेटपटूचे निधन, सचिन तेंडूलकर हळहळला; कोण होते 114 विकेट घेणारे हे दिवंगत खेळाडू

Dilip doshi passed away : भारतीय संघात एकेकाळी अढळस्थान प्राप्त करणारे दिग्गज डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज दिलीप दोशी यांचे इंग्लडमध्ये निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. भारतीय संघात त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेट सामने खेळले होते. माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी हे गेल्या काही वर्षांपासून लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासह राहत होते. दोशी यांचे हृदयाशी संबंधित समस्यांमुळे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

या माजी खेळाडूने कसोटी आणि वनडे सामन्यात भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर योगदान दिले होते. त्यांच्या निधनाबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह आजी माजी खेळाडूंनी दुखः व्यक्त केले. आज आपण दिलीप दोशी कोण आहेत हे जाणून घेऊया.

dilip doshi passed away

कोण होते दिलीप दोशी (क्रिकेट- कारकिर्द)

  • २२ डिसेंबर १९४७ दिलीप दोशी यांचा राजकोट येथे जन्म झाला होता. डावखुरे फलंदाज आणि मंदगती गोलंदाज म्हणून त्यांची चांगली ख्याती होती.
  • आतंरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आस्ट्रेलियाविरुद्ध ११ सप्टेंबर १९७९ साली कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनी शेवटचा कसोटी सामना १४ सप्टेंबर १९८३ साली पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
  • एकदिवसीय सामन्यात आतंरराष्ट्रीय पातळीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ६ डिसेंबर १९८० साली पदार्पण केले होते. त्यांनी शेवटचा वन डे सामना १७ डिसेंबर १९८० साली पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
  • भारतीय संघासाठी किती आहे योगदान
  • दिलीप दोशी यांनी रेड बॉल व्यतिरिक्त भारतीय संघासाठी व्हाइट बॉल क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले.
  • 33 कसोटी खेळल्यानंतर त्याने एकूण 114 विकेट्स घेतल्या.
  • 6 वेळा त्यांनी 5 विकेट्स घेण्याचा बहुमान मिळवला.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 15 सामने खेळल्यानंतर 22 विकेट्स घेतल्या.
  • प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये त्यांनी 238 सामने खेळत होते.
  • या श्रेणीत त्यांनी 898 विकेट घेतल्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकूण 75 विकेट्स घेतल्या.

बंगालचे क्रिकेटपटू

दिलीप रसिकलाल दोशी हे बंगालमधील एक भारतीय क्रिकेटपटू होते. दोशी हे त्या चार कसोटी गोलंदाजांपैकी एक आहेत ज्यांनी वयाच्या तिसाव्या वर्षानंतर पहिला कसोटी सामना खेळला. तरीही त्यांनी १०० हून अधिक बळी घेतले. दोषी व्यतिरिक्त इतर तीन खेळाडू क्लॅरी ग्रिमेट, सईद अजमल आणि रायन हॅरिस हे होत.

सचिन तेंडूलकरकडून दुखः व्यक्त

सचिन तेंडूलकरने दिलीप दोषी यांच्या निधनाबद्दल दुखः व्यक्त केले. त्याने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केली असून यात तो म्हणाला... "१९९० मध्ये मी दिलीपभाईंना पहिल्यांदा युकेमध्ये भेटलो आणि त्या दौऱ्यात त्यांनी मला नेटमध्ये गोलंदाजी केली. त्यांना माझ्यावर खूप प्रेम होते आणि मी त्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला. दिलीपभाईंसारख्या प्रेमळ मनाच्या व्यक्तीची मला खूप आठवण येईल. आमच्यात नेहमीच झालेल्या क्रिकेट संवादांची मला खूप आठवण येईल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+