DC vs MI WPL 2025 Final: मुंबई की दिल्ली, कोण होईल विजेता? रेकाँर्ड, इतिहास, वेळ वाचा संपूर्ण माहिती
महिला प्रीमियर लीग- २०२५ चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात १५ मार्चला खेळला जाईल. गुरुवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सचा पराभव करून मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने सलग तिसऱ्यांदा टेबल टॉपर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पाहता हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत एकमेकांसमोर येतील. यापूर्वी हे दोन्ही संघ दोन वर्षांपूर्वी म्हणजेच WPL- २०२३ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ७ विकेट्सने पराभव केला होता. आता दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल.

कसा आहे समोरासमोरचा रेकॉर्ड?
महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आत्तापर्यंत ७ वेळा आमने-सामने आले आहेत. या सगळ्या सामन्यांत या दोन्ही संघांमध्ये तगडी लढत झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने ४ सामन्यांत मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. तर ३ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. WPL- २०२५ हंगामात दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा २ गडी राखून पराभव केला. तर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखून पराभव केला होता.
कधी आणि कुठे होईल अंतिम सामना?
WPL- २०२५ चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी १५ मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल.
किती वाजता सुरू होईल सामना?
WPL- २०२५ चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल.
कोणत्या चॅनेलवर थेट प्रक्षेपण?
दोन्ही संघांमधील WPL २०२५ चा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पहायचे?
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील WPL- २०२५ च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Jio Hotstar वर पाहू शकता.












Click it and Unblock the Notifications