अगं बाब्वोव! फक्त ०.१२ सेकंदात स्टंपिंग; धोनीचा 'हा' व्हिडीओ पाहिल्याशिवाय आयपीएलची मजाच नाही
वयाच्या ४३ व्या वर्षी एमएस धोनीने त्याच्यातील चपळता आज पुन्हा एकदा दाखवून दिली. त्याचे विकेटकीपिंग कौशल्य अजूनही जगात अतुलनीय का आहे, हे त्याने आज पुन्हा एकदा दाखवून दिले. आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात धोनीने सूर्यकुमार यादवची पावणी लवते न लवते तोच त्याला यष्टीचीत केले. धोनीने फक्त ०.१२ सेकंदात सूर्यकुमार यादवचे यष्टी उडवून दिली. या सामन्यात सूर्याला फक्त २९ धावा करता आल्या.

नेमके काय घडले?
आज चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा तिसरा सामना सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या डावाच्या ११ व्या षटकात धोनीने एक अफलातून स्टंपिंग केली. नूर अहमद गोलंदाजी करत होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्य कुमार यादवने बॅट स्विंग केली पण चेंडू चुकला. धोनीला फक्त एका संधीची आवश्यकता होती. ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. सूर्यकुमार यादवला यष्टीचीत केले. धोनीचे हात इतके वेगवान होते की जेव्हा धोनीने यष्टी उधळल्या तेव्हा ते थेट कृतीत दिसणे अशक्य होते. स्लो मोशनमध्येही धोनीचे हात विजेच्या वेगाने हलत होते, हे दिसले.
स्टंपिंगमध्ये धोनीच किंग
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम एमएस धोनीच्याच नावावर आहे. आतापर्यंत त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये ४४ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. दिनेश कार्तिक ३७ स्टंपिंगसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉबिन उथप्पाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ३२ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील रोमांचक सामन्यात, एमएस धोनीने त्याच्या उत्कृष्ट विकेटकीपिंगचे प्रदर्शन केले आणि मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला क्षणार्धात यष्टीचीत केले. ही घटना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये घडली. धोनीच्या या कामगिरीने क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले.
𝙁𝙖𝙨𝙩. 𝙁𝙖𝙨𝙩𝙚𝙧. 𝙈𝙎 𝘿𝙝𝙤𝙣𝙞 🫡
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
📹 Watch #CSK legend's jaw-dropping reflexes behind the stumps 🔥
Updates ▶ https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @ChennaiIPL | @msdhoni pic.twitter.com/S26cUYzRd8
सर्वाधिक स्टंपिंग करणारे यष्टीरक्षक
महेंद्रसिंग धोनी - ४४ स्टंपिंग्ज
दिनेश कार्तिक - ३७ स्टंपिंग्ज
रॉबिन उथप्पा - ३२ स्टंपिंग्ज
ऋद्धिमान साहा - २६ स्टंपिंग्ज
ऋषभ पंत - २३ स्टंपिंग्ज












Click it and Unblock the Notifications