Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारताच्या 'या' टाॅप क्रिकेटरच्या घरी हलला पाळणा, बनला जुळ्या मुलांचा बाप, IPLमध्ये कमावले कोट्यवधी!

Cricketer Nitish Rana becomes father of twins : भारतीय स्टार क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये कोट्यवधी कमावणारा क्रिकेटपटू जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या सहा वर्षांनी त्याची ही इच्छा पूर्ण झाली असून फादर्स डेच्या एक दिवस आधी हा खेळाडू बाबा बनला आहे.

भारतीय क्रिकेटपटू नितीश राणा आणि त्यांची पत्नी सची मारवाह यांच्या घरात पाळणा हलला असून सची मारवाह हिला दोन जुळे मुलं झाली आहे. यामुळे घरातील आनंद द्विगुणित झाला आहे, या गोंडस बाळांचे कुटुंबियांनी स्वागत केले आहे.

Cricketer Nitish Rana becomes father

सचीची इन्स्टाग्रामवर पोस्ट

सचीने आज सोमवारी, १६ जून रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या जोडप्याला शनिवार, १४ जून २०२५ रोजी जुळी मुलं झाली. सोशल मीडियावर ही बातमी समोर आल्यानंतर चाहतेही या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत.

नितीश राणा आणि सची सहा वर्षांपुर्वी विवाहबद्ध

सची आणि क्रिकेटपटू नितीश राणा हे सहा वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. नितीश आणि सचीने सुमारे तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी दोघांनी लग्न केले. आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू केला आहे.

दोन लहान मुलं कुटंबात सहभागी

१४ जून रोजी एक नाही तर दोन मुलं त्यांना झाली आहेत. सचीने सोशल मीडिया अकाउंटवरील त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की आमच्या कायमच्या टॅटूपासून जुळ्या मुलांपर्यंत, एक कथानक ट्विस्ट जो आम्हाला अपेक्षित नव्हता. १४.०६.२५ रोजी आमच्या कुटुंबात दोन लहान मुलं सहभागी झाली आहेत.

कशी आहे नितीश राणाची क्रिकेट कारकिर्द

  • लीग (आयपीएल) मध्ये नितीश राणा अलीकडेच राजस्थान रॉयल्सकडून खेळला.
  • या हंगामात त्याने ११ सामन्यांमध्ये २१७ धावा केल्या, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.
  • त्याचा स्ट्राईक रेट १६१.९४ होता, परंतु स्नायूंदुखीमुळे त्याला हंगामाच्या मध्यभागी बाहेर पडावे लागले.
  • आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत, नितीश राणाने ११८ सामन्यांमध्ये २,८५३ धावा केल्या आहेत.
  • यामध्ये २० अर्धशतके आणि ८७ धावांचा सर्वोच्च स्कोअर आहे. त्याची सरासरी २७.९७ आणि स्ट्राईक रेट १३६.७६ आहे.
  • राजस्थान रॉयल्स संघाने मेगा लिलावात नितीश राणाला खरेदी केले. जेद्दाह इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठी झालेल्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने नितीश राणाला ४.२ कोटींना विकत घेतले आणि पुढील हंगामासाठीही तो संघात राहील अशी अपेक्षा आहे.
  • नितीश राणाने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून पदार्पण केले. त्याने भारतासाठी तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एका एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यात एकूण १५ धावा केल्या आहेत.
  • देशांतर्गत स्तरावर, राणाने ५४ प्रथम श्रेणी सामन्यात २,९५४ धावा आणि ७८ लिस्ट ए सामन्यात २,२८१ धावा केल्या आहेत. त्याने एकूण १० शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+