घटस्फोटाच्या 5 महिन्यांत हार्दिक पांड्याच्या आयुष्यात या 4 अभिनेत्रींची एंट्री, एकीने तर...
Hardik Pandya Love Affairs: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जेव्हापासून मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक घटस्फोट झाल्यापासून सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतो. पत्नी नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशाचे लग्न 2020 मध्ये झाले होते. यानंतर दोघांनीही आपल्या मुलाचे अगस्त्यचे स्वागत केले. जुलै 2024 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी संयुक्त निवेदन जारी करून घटस्फोटाची घोषणा केली होती. मात्र, हार्दिक आणि नताशा आपला मुलगा अगस्त्य एकत्र वाढवतील. हार्दिक पांड्याला नताशा स्टॅनकोविकपासून वेगळे होऊन फक्त 5 महिने झाले आहेत आणि त्याच दरम्यान त्याचे नाव अनेक सुंदरींसोबत जोडले गेले आहे.

हार्दिक पांड्याच्या लग्नाची तयारी!
ज्या सौंदर्यवतींचे नाव हार्दिक पांड्यासोबत जोडले जात आहे, त्यांचे ग्लॅमर जगाशी संबंध आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत असल्याची अफवा पसरली असून यावेळी त्याचे नाव हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरसोबत जोडले जात आहे.
हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडे
हार्दिक पांड्याचं नाव पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत जोडलं जात होतं. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात हार्दिक आणि अनन्या एकमेकांसोबत डान्स करताना दिसले. इतकंच नाही तर यावेळी अनन्या आणि हार्दिक एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवतानाही दिसले. दोघांनीही याबाबत काहीही सांगितलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक आणि अनन्या एकत्र व्हेकेशनसाठी ग्रीसला गेले होते. ग्रीसमधील एकाच पूलसाइडवरून दोघांची काही फोटो समोर आल्याने या अफवा सुरू झाल्या.
हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया
नताशाशी घटस्फोट घेतल्यानंतर क्रिकेटर हार्दिक पांड्याने काही काळ जास्मिन वालियाला डेट केले होते. जस्मिन वालिया एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही अभिनेत्री आहे. जास्मिन वालियाने म्युझिक इंडस्ट्रीतही स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे.
हार्दिक पांड्या आणि इशिता राज
बॉलिवूड अभिनेत्री इशिता राजने स्वतः हार्दिक पांड्यावर प्रेम व्यक्त केले होते. इशिता राज 'प्यार का पंचनामा' या चित्रपटात दिसली होती. इशिता राजने एकदा सांगितले होते की, हार्दिक पांड्याच्या प्रेमात वेडी आहे. हार्दिक एक महान क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला फलंदाजी पाहणे खूप मजेदार आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते. मी त्याच्याशी लग्नही करू शकते.
हार्दिक पांड्या आणि कायली जेनर
हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा सुरु आहेत. यावेळी त्याचे नाव हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरशी जोडले जात आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हार्दिक पांड्या आणि प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री कायली जेनर आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी लग्न करण्याचा विचार करत आहेत. मात्र, दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करत नाहीत, त्यामुळे या लग्नाच्या अफवांवर संशय व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications