Cricket New Rules 2026 : क्रिकेटचे नियम बदलले! MCC कडून 73 मोठे बदल जाहीर, 'हा' नियम तर भन्नाटच

Cricket New Rules 2026 MCC Announces 73 Changes : क्रिकेट विश्वातील नियमांचे रक्षक मानल्या जाणाऱ्या 'मेरीलेबोन क्रिकेट क्लब' (MCC) ने क्रिकेटच्या नियमावलीत तब्बल ७३ मोठे बदल जाहीर केले आहेत. आधुनिक क्रिकेटची गरज आणि खेळाडूंचे हित लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले असून ते १ ऑक्टोबर २०२६ पासून जगभरात लागू होणार आहेत. यामध्ये टेस्ट क्रिकेटमधील दिवसाचा शेवटचा ओव्हर आणि महागड्या बॅट्सच्या वापराबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Cricket New Rules 2026

१. टेस्ट क्रिकेटमध्ये आता ओव्हर पूर्ण करावीच लागणार

आतापर्यंत कसोटी किंवा बहु-दिवसीय सामन्यात दिवसाच्या शेवटच्या षटकात विकेट पडली, तर पंच तात्काळ 'स्टम्प्स' (खेळ थांबल्याचे) घोषित करत असत. यामुळे नवीन फलंदाजाला त्या दिवशी खेळण्यापासून सूट मिळायची. मात्र, नवीन नियमानुसार विकेट पडली तरी दिवसाचा शेवटचा ओव्हर पूर्ण करावाच लागेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला नवीन फलंदाज मैदानात पाठवावा लागेल आणि उरलेले चेंडू खेळावे लागतील. यामुळे खेळातील थरार शेवटच्या चेंडूपर्यंत कायम राहील.

२. 'लॅमिनेटेड' बॅट्सना आता अधिकृत परवानगी

सध्या क्रिकेट बॅट्सच्या, विशेषतः इंग्लिश विलोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हे लक्षात घेऊन MCC ने आता मोठ्यांच्या (Adult Recreational) क्रिकेटमध्येही लॅमिनेटेड बॅट्स (एकापेक्षा जास्त लाकडाचे तुकडे जोडून बनवलेल्या) वापरण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी अशा बॅट्स फक्त ज्युनियर क्रिकेटमध्ये वापरता येत होत्या. यामुळे क्रिकेट खेळणे अधिक परवडणारे होईल.

३. 'हिट विकेट' आणि 'डेड बॉल'च्या व्याख्येत स्पष्टता

हिट विकेट: जर एखादा फलंदाज शॉट मारल्यानंतर स्वतःचे संतुलन गमावून स्टम्प्सवर पडला, तर त्याला आता 'आउट' दिले जाईल. मात्र, क्षेत्ररक्षकाचा धक्का लागून तो स्टम्प्सवर पडला तर तो बाद मानला जाणार नाही.

डेड बॉल: चेंडू 'डेड' घोषित करण्यासाठी तो आता गोलंदाज किंवा यष्टीरक्षकाच्या हातात असणे अनिवार्य नाही. तो कोणत्याही क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिर असल्यास किंवा जमिनीवर थांबलेला असल्यास पंच चेंडू डेड घोषित करू शकतील.

४. इतर काही महत्त्वाचे बदल

ओव्हरथ्रो आणि मिसफिल्ड: ओव्हरथ्रो आणि चुकीचे क्षेत्ररक्षण यातील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. मुद्दाम स्टम्प्सवर फेकलेल्या चेंडूमुळे मिळालेल्या धावांनाच आता 'ओव्हरथ्रो' म्हटले जाईल.

विकेटकीपरचे ग्लोव्हज: चेंडू टाकताना यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज स्टम्प्सच्या रेषेत किंवा थोडे पुढे असल्यास आता तांत्रिक नो-बॉल दिला जाणार नाही. मात्र, चेंडू पकडताना त्याला स्टम्प्सच्या मागेच राहावे लागेल.

चेंडूचे वजन आणि आकार: महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या चेंडूंचे वजन आणि आकार आता 'Size 1, Size 2 आणि Size 3' अशा तीन स्पष्ट गटात विभागले जातील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+