चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडिया; कोहलीने ऑस्ट्रेलियाला धुतले; 2023चा घेतला बदला
Champions Trophy Semifinal 2025, India Won Go to Final Match : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत (Final Match of Champions Trophy) प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये चेस मास्टर विराट कोहली सामनावीर ठरला, ज्याने 84 धावांची एक अतिशय महत्त्वाची खेळी करून पुन्हा स्वत:ला सिद्ध केले.
मंगळवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सेमी फायनलमध्ये कोहलीने धावांचा पाठलाग करताना 3 मोठ्या भागीदारी केल्या.
त्याने श्रेयस अय्यरसोबत 91, अक्षर पटेलसोबत 44 आणि केएल राहुलसोबत 47 धावा जोडल्या. या भागीदारींमुळे धावांचा पाठलाग सोपा झाला. शेवटी, हार्दिक पंड्याने जलद 28 धावा केल्या आणि केएल राहुलने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. तो 42 धावा करून नाबाद परतला.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 265 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने 73 आणि अॅलेक्स कॅरीने 61 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सर्वबाद केले. मोहम्मद शमीने 3, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
#WATCH | Bhopal erupts into celebration after India beats Australia in the semifinal of #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/zTIHV5FHxY
— ANI (@ANI) March 4, 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचा स्कोअरबोर्ड
दोन्ही संघांचा प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कूपर कॉनोली, मार्नस लाबुशेन, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, नॅथन एलिस, बेन द्वारशीस, अॅडम झांपा आणि तन्वीर संघा.












Click it and Unblock the Notifications