Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind-Pak : विराट कोहलीने तोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अन् द्रवीडचा रेकॉर्ड, केला नवा विक्रम

विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यातील 158 वा झेल घेऊन सर्वाधिक एकदिवसीय झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (156 झेल) यांना मागे टाकले.

सर्वाधिक झेल घेणारे भारतीय खेळाडू

  • विराट कोहली - 157
  • मोहम्मद अझरुद्दीन - 156
  • सचिन तेंडुलकर - 140
  • राहुल द्रवीड - 124
  • सुरेश रैना - 102

Virat Kohli New Catch Record

विराट कोहलीने यांना टाकले मागे

रविवारी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यात विराट कोहलीने दोन झेल घेतले. त्याने आता 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये 158 झेल घेतले आहेत. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. तो एकूण यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मोहम्मद अझरुद्दीन

माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 334 एकदिवसीय सामन्यांमध्ये 156 झेल घेतले.

पाकिस्तानने दिले भारताला 242 धावांचे टारगेट

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानने भारताला 242 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाकडून सौद शकीलने एकमेव अर्धशतक झळकावले. त्याने 62 धावा केल्या आणि कर्णधार मोहम्मद रिझवान (46) सोबत 104 धावांची भागीदारी केली. दुसरीकडे, सलामीवीर बाबर आझम (२३ धावा) आणि इमाम-उल-हक (१० धावा) चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले.

त्याचबरोबर दुसरीकडे, भारतीय फिरकी गोलंदाजांविरुद्ध खालच्या मधल्या फळीलाही अपयश आले. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने 2 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना 1-1 यश मिळाले. 2 फलंदाज धावबाद झाले.

दोन्ही संघाचे प्लेइंग-11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

पाकिस्तान: मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), इमाम उल हक, सऊद शकील, बाबर आझम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+