ND vs NZ: भारतासाठी आनंदाची बातमी; मॅचपूर्वी न्यूझीलंडचा हा गोलंदाज होणार बाहेर, वाचा संपूर्ण प्रकरण
चॅम्पियन ट्राँफीच्या फायनल मॅचला आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. रविवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर चॅम्पियन ट्राँफीचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा एक स्टार गोलंदाज या अंतिम सामन्यात खेळू शकणार नसल्याचे सांगितले जात आहे.

स्टार गोलंदाज राहणार बाहेर?
बुधवारी लाहोर येथे न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रीका हा उपांत्या फेरीचा सामना झाला. त्यात ३३ वर्षीय मॅट हेन्रीला दुखापत झाली. कॅच पकडताना त्याच्या खाद्याला दुखापत झाली. खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. तथापि, प्रशिक्षक गॅरी स्टीड यांना आशा आहे की तो रविवारच्या अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त असेल. हेन्रीने आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक १० विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये भारताविरुद्धच्या गट सामन्यातील पाच विकेट्सचा समावेश आहे.
काय म्हणाले गॅरी स्टीड
मॅट हेन्रीवर सध्या उपचार सुरु आहेत. तो सध्या तंदूरुस्त नाही, मात्र अंतिम सामन्यापूर्वी तो तंदूरुस्त होऊ शकतो, अशी अपेक्षा न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी व्यक्त केली. भारताच्या कोणत्या खेळाडूकडून धोका वाटतो, यावरही स्टीड यांनी उत्तर दिले. स्टीड यांनी कबूल केले की, अंतिम सामन्यात वरुण चक्रवर्ती त्याच्या संघासाठी सर्वात मोठा धोका असेल. वरुण चक्रवर्ती या फिरकी गोलंदाजाला तोंड देण्यासाठी त्याच्या संघातील खेळाडू प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेन्रीने घेतल्या सर्वाधिक विकेट
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने आत्तापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. त्याने चॅम्पियन ट्राँफीत आत्तापर्यंत १० विकेट घेतल्या आहेत. त्यात भारताविरूद्धच्या गट सामन्यांतील पाच विकेटचाही समावेश आहे. त्यामुळे मॅट हेन्री हा लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावा, यासाठी न्यूझीलंडचा संघ प्रयत्न करत आहे. गेल्यावेळीही भारतीय संघासाठी मॅट हेन्री हाच सर्वात जास्त डोकेदुखी ठरला होता. मात्र आता अंतिम सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त झाला नाही तर, भारताला हा सामना जिंकणे सोप्पे होणार असल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications