चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल- इंडियाला 252 धावांचे लक्ष्य; मिशेलच्या 63 धावा; वरुण आणि कुलदीपचे 2-2 बळी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला 252 धावांचे टारगेट दिले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली. संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 63 धावा केल्या. तर मायकेल ब्रेसवेलने 53 धावांची नाबाद खेळी केली.
मिचेलने ग्लेन फिलिप्स (34) सोबत 57 आणि मायकेल ब्रेसवेल सोबत 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रचिन रवींद्र (37), विल यंग (15) आणि केन विल्यमसन (11) यांना मोठी सुरुवात देण्यात अपयश आले.

भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि मो. शमीने 1-1 विकेट घेतल्या. तर हार्दिक पंड्याने देखील एक विकेट घेतली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) March 9, 2025
Clinical bowling effort from #TeamIndia bowlers as they restrict New Zealand to a total of 251/7 in the Finals of the Champions Trophy!
Scorecard - https://t.co/OlunXdzr5n #INDvNZ #ChampionsTrophy #Final pic.twitter.com/F4WmHJ4wJR
दोन्ही संघांचा प्लेइंग-११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि विल्यम ओ'रोर्क.












Click it and Unblock the Notifications