Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ : टाॅप ऑर्डर फेल, विराट फक्त ११ धावांवर बाद; मात्र केला 'हा' ऐतिहासीक पराक्रम

चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 च्या गट फेरीचा अखेरचा सामना भारत वि. न्यूझीलंड या संघांमध्ये खेळवला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आधीच पात्र ठरले आहेत. कोणते संघ एकमेकांविरूद्ध भिडणार, हे आजच्या सामन्याच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आपल्या वनडे कारकिर्दीतील ३००वा वनडे सामना खेळत असलेल्या विराट कोहलीला ११ धावांवर माघारी परतावे लागले आहे.

Virat Kohli s 300th Match

टाँप ऑर्डर फेल

टीम इंडियाकडून प्रथम फलंदाजीसाठी सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी मैदानात उतरली. मात्र तिसऱ्याच ओव्हरला उपकर्णधार शुभमन गिलची विकेट पडली. त्याला गोलंदाज मॅट हेन्रीने बाद केले. शुभमन गिल अवघ्या 2 धावा करून बाद झाला. भारताने पहिली विकेट गमावली तेव्हा त्यांचा स्कोअर हा 15-1 असा होता. गिल पाठोपाठ रोहित शर्माची सुद्धा सहाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विकेट पडली. रोहित शर्माला काइल जेमिसनने बाद केले. यावेळी रोहित शर्माने 17 बॉलमध्ये 15 धावा केल्या. यावेळी भारताची धावसंख्या 22 धावांवर 2 विकेट अशी होती. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाला आहे. रोहितने 17 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर मॅट हेन्रीने विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कोहलीचा शानदार झेल ग्लेन फिलिप्सने घेतला त्याने पॉइंटवर उजवीकडे डायव्हिंग केले आणि एका हाताने झेल घेतला. कोहलीने 14 चेंडूत 11 धावा केल्या. भारताची धावसंख्या 7 षटकात 3 गडी बाद 30 धावा. श्रेयस अय्यर 1 धावा करून नाबाद आहे. अक्षर पटेलने अद्याप खाते उघडलेले नाही.

विराटसाठी आजचा सामना खास

आपल्या वनडे कारकिर्दीतील ३००वा वनडे सामना खेळत असलेल्या विराट कोहलीला ११ धावांवर माघारी परतावे लागले. मॅट हेन्रीच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहली झेलबाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदारहण दाखवत कमालीचा झेल टिपला. दरम्यान, आजचा सामना खेळत विराट कोहली ३०० एकदिवसीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या खास यादीत सामील झाला. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४६३ एकदिवसीय सामने खेळले. याशिवाय, सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर आहे. माहीने त्याच्या कारकिर्दीत ३५० एकदिवसीय सामने खेळले.

कशी आहे विराटची कारकीर्द

आतापर्यंत विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीत २९९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये माजी भारतीय कर्णधाराने ९३.४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५८.२ च्या सरासरीने १४,०८५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने ७३ वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे. या फॉरमॅटमध्ये विराट कोहलीचा सर्वोत्तम स्कोअर नाबाद १८३ धावा आहे. तसेच, विराट कोहली ४ एकदिवसीय विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचा भाग राहिला आहे. आज त्याच्या ३०० व्या सामन्यांत तो फक्त ११ धावा करु शकला.

बसला या क्रिकेटपटूंच्या पंक्तीत

सर्वाधीक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वरती सांगितल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर अव्वल आहे. त्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ४४८ सामने खेळले. श्रीलंकेचाच सनथ जयसूर्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सनथ जयसूर्याच्या नावावर ४४५ एकदिवसीय सामने आहेत. तर कुमार संगकाराने त्याच्या कारकिर्दीत ४०४ एकदिवसीय सामने खेळले. या खेळाडूंनंतर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी येतो. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानकडून ३९८ एकदिवसीय सामने खेळले. इंझमाम-उल-हकने ३७८ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ३७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या क्रिकेटपटूंच्या पंक्तीत आता विराट कोहलीही बसला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+