SA Vs Eng : दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघात आज सामना, कोण जिंकू शकणार, जाणून घ्या अंदाज
Champions trophy 2025, South Africa Vs England : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा 11 वा सामना आज म्हणजेच 1 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघ यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरू होईल.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. इंग्लंड संघ आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा संघ आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला 107 धावांनी हरवून एक मजबूत संदेश दिला होता. दुसरीकडे, दोन्ही सामने गमावल्याने इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. परंतु, ते या सामन्यात आपला सन्मान वाचवण्यासाठी खेळतील.

दक्षिण आफ्रिकेचा संघ संतुलित का दिसतो?
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रत्येक विभागात संतुलित दिसतो. फलंदाजी क्रमात रायन रिक्लटन, टेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन आणि एडेन मार्कराम सारखे फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची वेगवान गोलंदाजी. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि मार्को जेन्सेन हे त्रिकूट नवीन चेंडूवर धोकादायक ठरू शकतात. केशव महाराज फिरकी विभागात महत्त्वाची भूमिका बजावतील.
इंग्लंडसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अतिशय वाईट
दुसरीकडे, ही स्पर्धा इंग्लंडसाठी खूप वाईट राहिली आहे. इंग्लंड संघाने दोन्ही सामने गमावले आहेत आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तथापि, इंग्लंडकडे बेन डकेट आणि जो रूटसारखे घातक फलंदाज आहेत. पण इतर फलंदाज फारसे योगदान देऊ शकले नाहीत. गोलंदाजीत, जोफ्रा आर्चर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी गेल्या सामन्यात काही प्रभावी स्पेल टाकले, परंतु उर्वरित गोलंदाजांची कामगिरी सरासरी राहिली आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ७० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या काळात, दक्षिण आफ्रिकेने वरचढ कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने ३४ सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडने ३० सामने जिंकले आहेत. पाच सामन्यांमध्ये निकाल लागलेला नाही आणि एक सामना बरोबरीत सुटला. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
कोणता संघ जिंकू शकतो, जाणून घ्या अंदाज
चॅम्पियन्स ट्रॉफीत जर विचार केला तर आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. हा सामना इंग्लंडसाठी आव्हानात्मक असू शकतो, विशेषतः दक्षिण आफ्रिकेच्या मजबूत गोलंदाजी आणि फलंदाजीविरुद्ध. दक्षिण आफ्रिकेच्या अलीकडील कामगिरीचा विचार करता, ते स्पर्धेतील 11 वा सामना जिंकू शकतात. दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा होऊ शकते.
दक्षिण आफ्रिकेची जिंकण्याची शक्यता : 53%
इंग्लंडची जिंकण्याची शक्यता: 47%.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
दक्षिण आफ्रिका: रायन रिक्लटन (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जेन्सेन, वियान मुल्डर, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
इंग्लंड : फिलिप साल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक)/टॉम बँटन, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद/गस अॅटकिन्सन, आदिल रशीद.












Click it and Unblock the Notifications