कसे असेल भारताचे सेमिफायनलचे गणित? क्लासेन-रस्सीचे अर्धशतक; इंग्लंडच्या वाट्याला 'भोपळा'

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 च्या अंतिम सामन्यांतही इंग्लंडचा पराभव झाला. आज स्पर्धेतील 11 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला सात विकेटने हरवले. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 180 धावांचे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 29.1 फटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत दमदार प्रवेश मिळवला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीचा शेवट पराभवाने झाला. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडला या स्पर्धेत विजयाचं खातंही उघडता आलं नाही.

England vs South Africa

कसा झाला सामना?

कराची येथील नॅशनल स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडचा संघ ३८.२ षटकांत १७९ धावांवर सर्वबाद झाला. रूटने सर्वाधिक ३७ धावा केल्या. त्याच वेळी, जोस बटलरने २१ धावांचे योगदान दिले. जोफ्रा आर्चरने २५ धावांचे योगदान दिले. मार्को जॅन्सन आणि वेन मुल्डर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. धावांचा पाठलाग करताना, रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने नाबाद ७२ धावा केल्या. हेनरिक क्लासेन ६४ धावा करून बाद झाला. दोघांनीही १२२ चेंडूत १२७ धावांची भागीदारी केली. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने २ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियानेही ग्रुप बी मधून उपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानचे संघ बाहेर पडले.

कसे असेल सेमिफायनलचे गणित?

दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने गट ब मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संघाचे ५ गुण आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. ग्रुप अ मधील शेवटचा लीग सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार, २ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे गट अ चे रँकिंग निश्चित केले जाईल. भारत जिंकला तर त्याची उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. मात्र भारत हरला तर त्याला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळावे लागेल.

कसा होता संघ?

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+