अफगानिस्तानने धरला घरचा रस्ता; इंग्लंड- साऊथ अफ्रिका मॅच पूर्ण होण्याआधीच सुटले उपांत्य फेरीचे गणित
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कोणते संघ असतील, हे गणित आता सुटले आहे. उपांत्य फेरी गाठण्याच्या अफगाणिस्तानच्या आशा आता पूर्णपणे संपल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सामना संपण्यापूर्वी उपांत्य फेरीसाठी चौथा संघ निश्चित करण्यात आला आहे. कराची येथे झालेल्या त्यांच्या शेवटच्या ग्रुप बी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला १७९ धावांत गुंडाळले. त्यामुळे अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला.

अफगानच्या आशा कशा मावळल्या?
अफगानिस्तानला उपांत्य फेरी गाठणे सोप्पे नव्हते. इंग्लंड संघाने दक्षिण अफ्रिकेचा किमान २०७ धावांनी पराभव केला असता, तरच अफगानिस्तान उपांत्य फेरीत दाखल होऊ शकला असता. मात्र तसे झाले नाही. आजच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा डाव ३८.२ षटकांतच संपला. त्यांना फक्त १७९ धावा करता आल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पहिल्या डावाच्या संपल्याबरोबर गट ब मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहोचल्याचे निश्चित झाले.
चमत्काराची आशा ठरली फोल
आजच्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यांवर अफगानिस्तानचे भवितव्य अवलंबून होते. कारण चांगला रनरेटच्या आधारे त्याला उपांत्य फेरीत दाखल होता आले असते. परंतु आज इंग्लंडचा संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर नांगी टाकली. इंग्लंड एवढ्या कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला की, सामन्याचा निकाल काहीही लागला तरी, दक्षिण अफ्रिकेने आपल्या उपांत्य फेरीचे गणित सोडवले आहे. गट ब मध्ये अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ होते. या गटातील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. ज्यामुळे समीकरणे बदलली आणि उपांत्य फेरीची स्पर्धा शेवटपर्यंत मनोरंजक राहिली.
ग्रुप बी ची गणिते कशी होती?
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरवले. यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा सामना पावसामुळे वाया गेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पूर्ण होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी एक सामना जिंकला आणि चार गुणांसह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे सध्या प्रत्येकी तीन गुण आहेत. हे दोन्ही संघ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. जर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला तर ते पाच गुणांसह गट ब मध्ये अव्वल स्थानावर पोहोचतीलल.
इंग्लंडचा डाव कोसळला
कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्को जॅन्सनने तीन विकेट घेतल्याने त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडला मोठ्या भागीदाऱ्या करता आल्या नाहीत. इंग्लंडकडून अनुभवी फलंदाज जो रूटने ४४ चेंडूत सर्वाधिक ३७ धावा केल्या. तर जोफ्रा आर्चरने २५, बेन डकेटने २४, हॅरी ब्रूकने १९, जेमी ओव्हरटनने ११, लियाम लिव्हिंगस्टोनने ९, फिल साल्टने ८ आणि आदिल रशीदने २ धावा केल्या. दरम्यान, साकिब महमूद पाच धावा काढून नाबाद राहिला. जानसेन आणि मुल्डर व्यतिरिक्त केशव महाराज यांनी दोन, तर लुंगी एनगिडी आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


Click it and Unblock the Notifications