बांगलादेशविरुद्ध शतक ठोकणाऱ्या रचिनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण? काय करतेय? चर्चा वाढली
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज न्यूझीलंडचा सामना बांगलादेशसोबत झाला. या सामन्यात न्यूझिलंडच्या रचिन रवींद्रने शतक झळकावले. दुखापतीनंतर सावरलेल्या रचितचे आज धमाकेदार पुनरागमन केले. पाकिस्तानमधील तिरंगी मालिकेत क्षेत्ररक्षण करताना डोक्याला चेंडू लागून तो जखमी झाला होता. आज त्याने शतक पूर्ण करत आपण पूर्णपणे फिट झाल्याचे दाखवून दिले. रचिनने आज ९५ चेंडूंचा सामना करत ११ चौकार आणि १ षटकार मारत शतक पूर्ण केले.

ठोकले चौथे शतक
न्यूझीलंडचा उदयोन्मुख स्टार खेळाडू रचिन रवींद्रने आज पुन्हा एकदा आपली प्रतिभा सिद्ध केली. पाकिस्तान दौऱ्यादरम्यान तिरंगी मालिकेत खेळताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. ज्यामुळे काही काळ त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तिरंगी मालिकेदरम्यान एका सामन्यादरम्यान चेंडू पकडण्याचा प्रयत्न करताना, चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. वेगवान चेंडू लागताच रक्त वाहू लागले आणि दुखापत गंभीर असू शकते असे वाटले होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर त्याने शानदार पुनरागमन केले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत त्याने आज शतक ठोकले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील चौथे शतक आहे.
Another ICC ODI event, another century for Rachin Ravindra! At the age of just 25 he has now scored more centuries at ICC ODI events (4) than any other New Zealand men’s player ✍️ #ChampionsTrophy #CricketNation pic.twitter.com/Mm1BuJeUfT
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 24, 2025
कुठे झालाय जन्म?
रचिनचा जन्म १८ नोव्हेंबर १९९९ रोजी वेलिंग्टन येथे झाला. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती यांचा जन्म बेंगळुरू येथे झाला होता. ते एक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत. १९९७ मध्ये त्यांचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. रचिन रवींद्र यांच्या कुटुंबात क्रिकेट नेहमीच एक भाग होता. त्यांचे वडील क्रिकेटचे चाहते होते आणि न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांनी क्लब पातळीवर खेळणे सुरू ठेवले.रचिनचा असा विश्वास होता की त्याचे नाव त्याच्या वडिलांच्या आवडत्या क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड ("रा" म्हणजे राहुल आणि "चिन" म्हणजे सचिन) यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. पण हे नाव केवळ योगायोग होता.
प्रेयसीचीही होतेय चर्चा
रचिन रवींद्र हा एक सुंदर मुलीसोबत गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेली प्रेमिला मोरार ही रचिनची गर्लफ्रेंड आहे. प्रेमिला ही न्यूझिलंडच्या मैस्सा युनिवर्सिटीत शिकली आहे. प्रेमिलाने स्वतःही तिच्या जगात चांगले नाव कमावले आहे. प्रेमिलाचे इन्स्टाग्रामवर १० हजारांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत. वास्तविक या दोघांनीही त्यांच्यातले नाते कधीच लपवले नाही. आज रचिनने शतक ठोकल्यानंतर तिच्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली.












Click it and Unblock the Notifications