Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video: चॅम्पियन्स ट्रॉफीचं 'जीतो बाजी खेल के...'ऑफिशियल सॉन्ग रिलीज, सोशल मिडीयावर घालतयं धुमाकूळ

champions trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी प्रसिद्ध गायक आतिफ असलम यांचे पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केलं आहे. या गाण्याच्या रिलीजमुळे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या 15 सामन्यांच्या मालिकेत अधिक उत्साह वाढणार आहे.

या कार्यक्रमाचे अधिकृत गाणे अब्दुल्ला सिद्दीकी यांनी तयार केले आहे. या गाण्येच बोल अदनान धुळ आणि असफंदयार असद यांनी लिहिले आहे. हा संगीत व्हिडिओ रस्त्यांपासून बाजारपेठांपर्यंत आणि स्टेडियमपर्यंत पाकिस्तानच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा दृश्य उत्सव आहे आणि खेळाबद्दलचे प्रेम आणि आनंद दर्शवितो.

jeeto baazi khel ke icc official song

हे अधिकृत गाणे जगभरातील लोकप्रिय स्ट्रीमिंग ऑडिओ प्लॅटफॉर्मवरील चाहत्यांसाठी उपलब्ध आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत जगातील अव्वल आठ संघ 19 दिवसांच्या 15 सामन्यांमध्ये आपले सर्वोत्तम प्रदर्शन करतील. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, मुख्य गायक आतिफ असलम म्हणाला, 'मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि मला नेहमीच वेगवान गोलंदाज व्हायचे होते.' खेळाबद्दलच्या माझ्या आवडी आणि समजुतीमुळे मला प्रेक्षकांच्या उत्साहाशी आणि चाहत्या असल्याच्या भावनेशी जोडलेले वाटतं.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची वाट पाहायचो

मी विशेष भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहायचो, जो नेहमीच भावना आणि भावनिक मूल्यांनी भरलेला असायचा. आणि म्हणूनच मी आयसीसी मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अधिकृत गाण्याचा भाग होण्यास खूप उत्सुक असल्याचं गायक आतिफ असलम याने म्हटलं आहे.

या गाण्याच्या लाँचिंग प्रसंगी बोलताना आयसीसीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी अनुराग दहिया म्हणाले, "आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी उत्साह वाढत आहे. आज आम्हाला अधिकृत कार्यक्रमाचे गाणे लाँच करताना आनंद होत आहे. कार्यक्रम सुरू होण्यास 12 दिवस शिल्लक असताना चाहते पाकिस्तानची ओळख आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा खरा उत्सव दर्शविणारे गाणे ऐकण्याची अपेक्षा करू शकतात.

चाहत्यांना अजूनही पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकिटे खरेदी करण्याची संधी आहे. आयसीसीच्या मते रविवार 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याची तिकिटे दुबईतील पहिल्या उपांत्य फेरीच्या समाप्तीनंतर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+