Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इशान किशन, संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं, या दिग्गजांची नावेही यादीत

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची आज घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली.

या स्पर्धेत काही महत्त्वाच्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी या फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, परंतु त्यांना संघात मिळालं नाही. चला जाणून घेऊया त्या पाच खेळाडूंबद्दल ज्यांची नावे चर्चेत होती पण त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळालं नाही.

Sanju Samson

फोटो सौजन्य- पीटीआय

संजू सॅमसनला संधी मिळाली नाही

संजू सॅमसनला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळालेले नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. संजू सॅमसनची निवड न होण्यामागील कारण म्हणजे संघ संतुलन आणि विकेटकीपिंगचे पर्याय असू शकतात. 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इशान किशन

इशान किशनने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळवले होते. यानंतर त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून सिद्ध करुन दाखवले होते की, तो टीम इंडियासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. त्याने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. असे असूनही, तो टीम इंडियामध्ये आपले स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला आहे.

शिवम दुबे

शिवम दुबे यालाही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. शिवम दुबेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. निवडकर्त्यांनी संघात अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या रूपात फक्त एकाच वेगवान गोलंदाजाचा समावेश केला आहे. शिवम दुबे आणि नितीश कुमार रेड्डी यांना संघातून वगळण्यात आलं आहे.

मोहम्मद सिराजचा पत्ता कट

मोहम्मद सिराजला त्याच्या अलीकडील फॉर्म आणि कामगिरीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांना संघात कायम ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे.

युजवेंद्र चहलही बाहेर

युजवेंद्र चहलला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी संघात स्थान न मिळणे हे त्याच्यासाठी निराशाजनक असू शकते, विशेषतः गेल्या वर्षी आयसीसी टी- 20 विश्वचषकात तो भारतीय संघाचा भाग होता. इंग्लंडविरुद्धच्या अलिकडच्या टी- 20 मालिकेतही चहलला संधी मिळाली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+