Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पाकिस्तानमध्येही भारतीय संघाच्या विजयाचा जल्लोष! पाकच्या खेळाडूकडून टीम इंडियावर कौतूकाचा वर्षाव

Champions Trophy Pakistan Reaction: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करून भारतीय संघाने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलं आहे. दुबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विजेतेपद पटकावण्याची 12 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. जगभरातून भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Indian team victory

पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियावर कौतूकाचा वर्षाव

पाकिस्तानी क्रिकेट चाहते आणि काही माजी क्रिकेटपटूंनीही भारतीय संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, गेल्या 10 वर्षांत भारत आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वोत्तम संघ बनला आहे. गेल्या वर्षीही टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली होती. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमत्कार केले आहेत. वरुण आल्यापासून विराटने पुनरागमन केले आहे. अंतिम सामन्यात रोहितने ज्या पद्धतीने फलंदाजी केली. भारताचे खूप खूप अभिनंदन. भारत या चॅम्पियन्स ट्रॉफीला पात्र होता.

शाहिद आफ्रिदीने केले अभिनंदन

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सामा टीव्हीशी बोलताना भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. आफ्रिदीने म्हटलं आहे की, भारतीय संघाने दुबईतील परिस्थितीनुसार संघ निवडला आहे. ज्याचा त्याला फायदा झाला. भारतीय संघाने प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी केली. पाकिस्तानशी तुलना करताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, भारतीय संघात अनेक अष्टपैलू खेळाडू असण्याचा भारतीय संघाल फायदा झाला आहे.

पाकिस्तानी चाहत्यांनीही साजरा केला आनंद

भारतीय संघाने विजेतेपद पटकावल्यानंतर काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर पाकिस्तानी चाहते देखील भारताच्या विजयाने आनंदी दिसले. त्यांनी भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तर काही चाहते भारतीय संघाच्या विजयाने निराशही झाले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय फिरकीपटूंच्या तगड्या गोलंदाजीमुळे भारताने विजय मिळवला. भारताने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विजय मिळवला होता, जो देशाच्या संघाचा सातवा आयसीसी ट्रॉफी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+