Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind VS Pak : हॅट्रीक हुकली खरी, पण 'हे' काम करुन कुलदीप बनला पाचवा भारतीय गोलंदाज

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारताचा जादुई स्पिनर कुलदीप यादवने नवा इतिहास रचला. या सामन्यात 300 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा तो पाचवा फिरकी व 13 वा भारतीय गोलंदाज ठरला. दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकिस्तानविरुद्धच्या भारताच्या महत्त्वाच्या सामन्यात डावखुरा मनगट फिरकी गोलंदाजाने हा टप्पा गाठला.

Kuldeep s 300 wickets

कुलदीपच्या तीन विकेट

या सामन्यात कुलदीपने कुलदीपने पाकिस्तानचा धोकादायक फलंदाज सलमान आघा याला बाद करून तिनशे आंतरराष्ट्रीय विकेटचा टप्पा गाठला. तो एवढ्यावरच थांबला नाही कारण त्याने पुढच्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीला बाद केले. त्याची हॅट्ट्रीक थोडक्यात हुकली. त्यानंतर नसीम शाहच्या रूपात त्याची तिसरी विकेट घेतली. कुलदीपने या सामन्यात ४० धावा देत तीन महत्त्वाचे बळी मिळवले. भारताने पाकिस्तानला २४१ धावांत गुंडाळले.

१६३ सामन्यांत ३०० बळी

कुलदीपने १६३ सामन्यांमध्ये ३०० बळी घेण्याचा टप्पा पूर्ण केला.
कसोटी: १३ सामने, ५६ विकेट्स
एकदिवसीय सामने: ११० सामने, १७७ विकेट्स
टी२०: ४० सामने, ६९ विकेट्स

कसे राहिले होते प्रदार्पण

कुलदीप यादवने २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. डाव्या हाताच्या गोलंदाजी करणाऱ्या या फिरकीपटून आपल्यातील व्हेरिएशनने त्यावेळी समालोचकांची मने जिंकली होती. फ्लाइट, डिप आणि गुगली असे गोलंदाजीतले सगळे अस्त्र वापरून त्याने अनेकदा फलंदाजांना चकवा दिला आहे. कुलदिपच्या गोलंदाजीवर भारताने आत्तापर्यंत अनेक सामने जिंकले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+