Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बॅट्समन की बॉलर? दुबईची पीच कुणाला साथ देणार... वाचा, IND vs NZ लढतीतील खेळपट्टीचा अंदाज

चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 चा 12 वा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी लढतील. या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत आपले स्थान यापूर्वीच निश्चित केले आहे. या सामन्यानंतरच उपांत्य फेरीचे समीकरण निश्चित होईल. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानेही ग्रुप बी मधून अंतिम 4 मध्ये स्थान मिळवले आहे. परंतु उपांत्य फेरीत त्यांचे प्रतिस्पर्धी कोण, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यानंतरच उपांत्य फेरीचे समीकरण स्पष्ट होईल.

Dubai Stadium Pitch Report

भारताने दोन्ही सामने जिंकले

आयसीसी चॅम्पियन ट्राँफीत टीम इंडियाचे आत्तापर्यंत फक्त दोन सामने झाले. तेही दुबईत खेळविले गेले. या दोन्ही सामन्यांत भारताने मोठा विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला हरवलं. तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला हरवले. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडले आहेत. आता येथे फक्त तेच सामने खेळवले जातील ज्यात भारतीय संघ असेल. म्हणजेच, उपांत्य फेरी वगळता, जर टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचली, तर येथे फक्त जेतेपदाचा सामना खेळला जाईल.

कशी आहे खेळपट्टी?

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत 60 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. त्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना 22 वेळा विजय मिळाला आहे. तर 36 वेळा रन चेस करणारा संघ विजयी झाला आहे. या स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय संघाने दोन्ही वेळा लक्ष्याचा पाठलाग केला आहे आणि जिंकला आहे. इंग्लंडने येथे पाकिस्तानविरुद्ध 355 धावा केल्या होत्या तिच या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर युएईने नामिबियाला 91 धावांवर बाद करत, निचांकी धावसंख्येचा विक्रम केला होता. येथे 287 धावांचा पाठलाग आणि 168 धावांचा बचावही झाला आहे.

पीच रिपोर्ट काय सांगतो?

दुबईची खेळपट्टी खूपच संथ मानली जाते. साधारणपणे फिरकी गोलंदाजांना येथे मदत मिळते. परंतु गेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी येथे 11 बळी घेतले आहेत. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, पाठलाग करणाऱ्या संघाने चार वेळा विजय मिळवला आहे. या मैदानाचा एकूण रेकॉर्ड पाहिला तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 वेळा विजय मिळवला आहे. पाठलाग करणाऱ्या संघाने 36 वेळा विजय मिळवला आहे. मागील सामन्यांमध्ये, वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूमुळे थोडा स्विंग मिळाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+