Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs Aus Semi-Final : रोहित शर्माने सलग 14व्यांदा टॉस गमावला, ऑस्ट्रेलियाची पहिल्यांदा बॅटिंग

India vs Australia Semi-Final 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सेमी फायनल सामना आज (4 मार्च) दुबई येथे आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अशाप्रकारे, भारतीय संघाने 14 व्यांदा नाणेफेक गमावली आहे. भारतीय संघाने आपल्या गटात अव्वल स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान मिळवून अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनल सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.
हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. येथे दोन्ही संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले आहेत.

Champions Trophy 2025

आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत हे दोन्ही संघ नवव्यांदा आमनेसामने आले आहेत. मागील लढतींमध्ये दोन्ही संघांनी 4-4 असा विजय मिळवला होता. हे दोघे शेवटचे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले होते. जेव्हा ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची भारताकडे संधी आहे.

सामना नवीन खेळपट्टीवर खेळला जाणार

क्रिकबझच्या मते, आतापर्यंत येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांसाठी तीन वेगवेगळ्या खेळपट्ट्या वापरण्यात आल्या आहेत. तथापि, आजच्या सामन्यासाठी एक नवीन पीच तयार करण्यात आलेले आहे.

वन-डे मध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 151 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 57 मध्ये आणि ऑस्ट्रेलियाने 84 मध्ये विजय मिळवला. 10 सामन्यांमध्ये निकाल लागला नाही. दोन्ही संघ दुबईमध्ये पहिल्यांदाच आमनेसामने येत आहेत. भारताने स्पर्धेतले तिन्ही सामने याच मैदानावर खेळले, तर ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने पाकिस्तानमध्ये खेळले.

अय्यर भारताचा सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी शतके झळकावली - शुभमन गिल आणि विराट कोहली. श्रेयस अय्यरने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतके झळकावली. तो ३ सामन्यांमध्ये १५० धावा करून संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. संघाकडून मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ५ विकेट घेतल्या आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया संघ :

ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, कूपर कॉनोली, अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, स्पेन्सर जॉन्सन आणि अ‍ॅडम झांपा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+