Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा धावांचा पाऊस पाडणार, दुबईमध्ये हिटमॅनचा एक अद्भुत रेकॉर्ड

Champions Trophy 2025, Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ला आजपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यात कराची येथे खेळला जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या भारत विरुध्द पाकिस्तान सामना 23 फ्रेबुवारीला दुबई येथे खेळला जाणार आहे.

दोन्ही संघ पुन्हा एकदा धमाकेदार लढतीसाठी सज्ज आहेत! दुबईच्या मैदानावर भारतीय खेळाडूच्या बॅटने या मैदानावर मोठी धावा संख्येची अपेक्षा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत रोहीत शर्माच्या खेळीकडे क्रिकेट प्रेमींच लक्ष असणार आहे.

Rohit Sharma

रोहित शर्माला 'दुबई डॉन' म्हणून असचं ओळखले जात नाही. या मैदानावर त्याची कामगिरी इतकी चमकदार राहिली आहे की, त्याला रोखणे पाकिस्तानी गोलंदाजांसाठी स्वप्नासारखे असेल. या मैदानावर पाच सामन्यांमध्ये 'हिटमॅन'ने 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या आहेत.

दुबईमध्ये रोहित शर्माची शानदार कामगिरी

हिटमॅन रोहित शर्माच्या बॅटमधून दुबईच्या मैदानावर 25 चौकार आणि 13 षटकार लागले आहेत! त्याच्या स्ट्राईक रेटनेही सर्वांना आश्चर्यचकित केले आहे, जो 90 च्या वर आहे. एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावणाऱ्या या फलंदाजाच्या विक्रमावरून असे दिसून येते की, दुबईमध्ये त्याच्या बॅटने नेहमीच धावांचा पाऊस पडतो!

रोहित शर्मा दुबईत पुन्हा एकदा इतिहास रचणार का?

आता टीम इंडियाचा कर्णधार भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. यावेळी पाकिस्तानी गोलंदाज हिटमॅनला रोखू शकतील का, की रोहित शर्मा दुबईमध्ये आणखी एका शानदार खेळीने इतिहास रचेल?

IND vs PAK: सर्वात मोठा सामना 23 फेब्रुवारीला होणार

दुबईमध्ये रोहित शर्माची बॅट नेहमीच विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. आता जेव्हा तो भारत पाकिस्तानसारख्या हाय-व्हॉटेज सामन्यात मैदानात उतरेल तेव्हा प्रत्येक धाव, प्रत्येक शॉट आणि प्रत्येक क्षण रोमांचक असणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात रोहित शर्माची आणखी एक अद्भुत खेळी पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान संघ: मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+