3.5 कोटी रुपयांचा व्हीआयपी बॉक्स? भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ
Champions Trophy 2025, Ind vs Pak : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला आज बुधवार 19 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. कराची येथे पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामन्याने सुरुवात झाली आहे. यावेळी पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान आहे, त्यामुळे बहुतेक सामने फक्त पाकिस्तानमध्येच खेळवले जातील. तर भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात एक हाय व्होल्टेज सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारत विरुध्द पाकिस्तान सामना कधी ?
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळला जाईल. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या अलिकडच्या मुलाखतीत मोहसिन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमधील स्टेडियमच्या अपग्रेडेशनमध्ये त्यांनी कशी मोठी गुंतवणूक केली आहे याबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की आमच्या स्टेडियमचे शेवटचे नूतनीकरण 1996 च्या विश्वचषकासाठी करण्यात आले होते.

व्हीआयपी बॉक्सची किंमत 3.5 कोटी रुपये ?
आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, सामा टीव्हीच्या वृत्तानुसार पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी दुबई स्टेडियममध्ये 400,000 डॉलर्स (3.47 कोटी रुपये) किमतीच्या व्हीआयपी बॉक्स तिकिटांच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटलं आहे. खरंतर दुबई स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्स तिकिटांची विक्री 3.5 कोटी रुपयांना होत असल्याची बातमी होती. ज्यावर मोहसीन नक्वी यांनी त्यांची बाजू मांडली आहे.
मोहसीन नक्वी यांनी तिकीट विकले ?
दुबईमध्ये व्हीआयपी बॉक्स तिकिटाची किंमत 3.50 कोटी रुपये असल्याचे सांगितले जातं. मोहसीन नक्वी यांनी व्हीआयपी बॉक्समध्ये बसून सामना पाहण्याची ऑफर नाकारली आहे. मोहसिन नक्वी यांना कदाचित हे लक्षात आले असेल की, व्हीआयपी म्हणून सामना पाहण्याऐवजी ते स्टँडमध्ये बसून सामान्य क्रिकेट प्रेमींशी जोडले जाऊ शकतात. परंतु काही वृत्तांमध्ये असा दावा केला आहे की मोहसिन नक्वी यांनी 30 आसनी व्हीआयपी हॉस्पिटॅलिटी बॉक्स सुमारे 4,00,000 दिरहम (94 लाख रुपये) ला विकला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने मोफत कुठे पहायचे
क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क 18 वाहिन्यांवर दुपारी 2:00 वाजता (IST) सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंग पसंत करणाऱ्यांसाठी JioHotstar अॅप आणि वेबसाइट एकाच वेळी लाईव्ह कव्हरेज प्रदान करतील. तुम्ही जिओ हॉटस्टारवर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.












Click it and Unblock the Notifications