IND vs NZ Final: उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना किती वाजता खेळला जाईल? वेळेत काही बदल आहे का?
IND vs NZ Final Match Time: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना प्रचंड उत्सकुता लागली आहे. या सामन्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिसरे विजेतेपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. हा सामना केवळ खेळाडूंसाठीच नाही तर देशभरातील चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी उद्या (ता. 9 मार्च) रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाला विजयाकडे नेण्यासाठी सज्ज आहेत. आता चाहते या रोमांचक अंतिम सामन्याची वेळ काय आहे आणि यावेळी काही बदल झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर चला मग या महत्त्वाच्या सामन्याची सर्व माहिती जाणून घेऊया.

IND vs NZ Final Match Time: सामन्याची वेळ बदलली आहे का?
अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात हा प्रश्न असू शकतो की सामन्याची वेळ बदलली आहे की नाही. त्यामुळे तुम्हाला हे जाणून आनंद होईल की सामन्याची वेळ आधीच जाहीर केल्याप्रमाणेच राहणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामन्याचे वेळापत्रक
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. या ऐतिहासिक सामन्याचा टॉस दुपारी 2:00 वाजता होईल आणि सामना दुपारी 2:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल.
थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंग
जर तुम्हाला हा सामना टीव्हीवर पहायचा असेल तर तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय जर तुम्हाला ऑनलाइन स्ट्रीमिंग पहायचे असेल तर तुम्हाला जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग मिळेल, जेणेकरून तुम्ही कुठूनही या रोमांचक सामन्याचा आनंद घेऊ शकता.
न्यूझीलंड: मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.












Click it and Unblock the Notifications