Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Champions Trophy 2025 चे सर्व सामने कधी, कुठे, कसे पहायचे? स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

Champions Trophy 2025, ind vs ban : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारीपासून होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाकिस्तानच्या कराची येथे होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तान आणि युएईमध्ये आयोजित केली जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा नववा सीझन आहे. या काळात आठ अव्वल एकदिवसीय संघ एकमेकांना भिडणार आहेत. पाकिस्तान गतविजेता म्हणून या स्पर्धेचे आयोजन करत आहे. चाहते स्पर्धेचे सर्व सामने कुठे पाहू शकतात ते जाणून घेऊया.

Champions Trophy 2025

टीम इंडियाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) सुरू होईल. हे संघ ग्रुप A मध्ये आहेत. ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यापर्यंत या स्पर्धेत रोमांचक क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक

स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे खेळला जाईल. हे सामने चार ठिकाणी खेळवले जातील: यामध्ये कराची, लाहोर, पाकिस्तानमधील रावळपिंडी आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचा पहिला सामना कधी ?

चॅम्पियन्स ट्रॉफीतील टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेश या संघाशी 20 फेब्रुवारी रोजी पाहायला मिळेल. भारत विरुध्द बांगलादेश असा पहिला पहिला सामना असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (09:00 GMT) खेळला जाईल.

भारत-पाकिस्तान सामना कधी आहे?

संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरा सामना हा भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 23 फेब्रुवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (09:00 GMT) दुबई येथे होणार आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (09:00 GMT) पाकिस्तान विरुध्द न्यूझीलंड या सामन्याने सुरु होणार आहे.

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कुठे पहायचे

क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स आणि नेटवर्क 18 वाहिन्यांवर दुपारी 2:00 वाजता (IST) सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. ऑनलाइन स्ट्रीमिंग पसंत करणाऱ्यांसाठी JioHotstar अॅप आणि वेबसाइट एकाच वेळी लाईव्ह कव्हरेज प्रदान करतील. तुम्ही जिओ हॉटस्टारवर भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

Champions Trophy 2025: लाईव्ह कव्हरेज माहिती

प्रत्येक सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता होणार आहे. याशिवाय सामना दुपारी 2.30 वाजता नियोजित वेळेत सुरू होईल. यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळेल. सर्व संघ वर्चस्वासाठी स्पर्धा करतील.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+