Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

CCL- 2025 : मुंबई हिरोज फुस्स..! भोजपुरी दबंग संघाने ८ विकेट्सने लोळवले; 'हा' खेळाडू चमकला

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग- २०२५ च्या सामन्यात आज मुंबई हिरोजचा दारुण पराभव झाला. मनोज तिवारीच्या नेतृत्वाखालील भोजपुरी दबंग संघाने मुंबई हिरोजचा ८ गडी राखून दमदणीत पराभव केला. भोजपुरी संघाचा स्टार फलंदाज असगर खान या सामन्याचा हिरो ठरला. त्याने दोन्ही डावात नाबाद रहात ९६ आणि ५८ धावांच्या शानदार खेळी केली.

Celebrity Cricket League-2025

मुंबईची प्रथम फलंदाजी

भोजपुरी दबंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई हिरोज संघाला १० षटकांत ७ गडी गमावून फक्त १२५ धावा करता आल्या. मुंबईकडून कर्णधार साकिब सलीम कुरेशी (३५) आणि सिद्धांत रवींद्र मौली (३७) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मुंबईच्या इतर फलंदाजांना अगदी स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये जावे लागले. भोजपुरी दबंगकडून विक्रांत सिंग आणि असगर खान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मुंबईच्या १२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भोजपुरी दबंग संघाने पहिल्या डावात १५० धावा करत २५ धावांची आघाडी घेतली. त्यात असगर खानने नाबाद ९६ धावा केल्या. सलामीवीर आदित्य ओझाने ३८ धावांची शानदार खेळी केली.

दुसऱ्या डावातही मुंबई फेल

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबई हिरोज संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात सर्वाधिक धावा करणारा सिद्धांत रवींद्र मौली खाते न उघडताच बाद झाला. शब्बीर अहलुवालियाने शानदार फलंदाजी करत ३२ चेंडूत ८२ धावा केल्या. परंतु असगर खानने त्याला धावचीत करून मुंबईच्या आशांना मोठा धक्का दिला. मुंबई हिरोजला ४ गडी गमावून फक्त १२८ धावा करता आल्या. निशांत दहियाने ३३ धावांचे योगदान दिले.

भोजपुरीचा ५.५ षटकांत विजय

मुंबईने पहिल्या व दुसऱ्या डावात मिळून भोजपरी दबंग संघाला १०३ धावांचे लक्ष दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भोजपुरी दबंग संघाने चांगली सुरुवात केली. मुंबईने दिलेले १०३ धावांचे लक्ष या संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात ५.५ षटकांत पूर्णे केले. असगर खानने दुसऱ्या डावातही नाबाद ५८ धावा केल्या. आदित्य ओझानेही नाबाद २१ धावा करून संघाला शानदार विजय मिळवून दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+