Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPLनंतर 'या' लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूत स्पर्धा, 1300 जणांनी केली नोंदणी; कोण कोण खेळणार? वाचा

Canada Super 60 League 2025 : आयपीएलचा धमाका सध्या सुरु आहे, या खेळाच्या महाकुंभात असंख्य खेळाडू आपल्या खेळातील प्रावीण्य दाखवत आहेत, तर काहीजण नेत्रदिपक खेळ करत आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचे अनेकांचे स्वप्न असते त्यात अनेकजण धडपड करत असतात.

आयपीएलला जसा प्रतिसाद असतो अगदी तसाच अनेक खेळाडूंनी दुसऱ्या लीगमध्ये खेळण्यासाठी पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी धडपड सुरु केली आहे. आयपीएलशिवाय असलेल्या या लीगसाठी एकूण 1300 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ही लीग जुलैमध्ये सुरू होईल.

Canada Super 60 League 2025


कोणत्या लीगसाठी 1300 खेळाडूंनी केली नोंदणी?

आयपीएलनंतर ज्या स्पर्धेत खेळण्यासाठी खेळाडू आतूर आहे त्या लीगचे नाव कॅनडा सुपर 60 आहे, जी टी-10 लीग आहे. या लीगसाठी एकूण 1300 खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

ही लीग आहे 10 - 10 षटकांचीच

आयपीएल लीग 20 -20 षटकांची स्पर्धा आहे. मर्यादीत 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यापेक्षा ही 20-20 षटकांची स्पर्धा कमालीची लोकप्रिय झाली. या स्पर्धेत धावांचा पाऊस पडतो, पण त्यापेक्षा कमी षटकांची कॅनडा सुपर 60 स्पर्धा आहे. या स्पर्धेत 10-10 षटके दोन संघ खेळतात व त्यातून विजयी संघाची निश्चिती होते.

महिला आणि पुरुष खेळाडूंची नोंदणी

कॅनडा सुपर 60 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 1,135 पुरुष क्रिकेटपटू आणि 235
महिला क्रिकेटपटूंनी लीगसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

कधी होणार स्पर्धा?

कॅनेडियन लीग 60चा मसुदा लवकरच जाहीर केला जाईल, असे आयोजकांनी सांगितले आहे. खास म्हणजे महिला आणि पुरुष लीगचा पहिला हंगाम जुलैमध्ये सुरू होईल अशी आशाही आयोजकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या खेळाडूंनी केली नोंदणी?

कॅनेडियन लीगमध्ये महिला क्रिकेटपटूंमध्ये मॅडी ग्रीन, फ्रॅन जोन्स, रोझमेरी मेयर, लॉरेन विनफिल्ड हिल, जेस जोनासन, डिआंड्रा डॉटिन या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. तर ॲलेक्स हेल्स, फिन ऍलन, जेसन रॉय, केशव महाराज, टिम साउथी, टिम सेफर्ट, लुंगी एनगीझी, भानुका राजपक्षे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे यासह सध्याच्या अनेक दिग्गजांनी या स्पर्धेत नोंदणी केली आहे.

हेही वाचा : आयपीएल दरम्यान सचिन तेंडुलकरची मुलगी साराने खरेदी केला मुंबईचा संघ, घ्या जाणून

हेही वाचा : आयपीएल 2025 मध्ये 'या' खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार! वाचा लांब सिक्स मारणारे टाॅप 10 बँट्समन

हेही वाचा: IPL 2025: कोण बनला कोणत्या संघाचा कर्णधार? सर्व 10 आयपीएल संघांच्या कर्णधारांची संपूर्ण यादी, वाचा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+