आयपीएल दरम्यान सचिन तेंडुलकरची मुलगी साराने खरेदी केला मुंबईचा संघ, घ्या जाणून
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव असणा-या सचिन तेंडुलकरच्या लाडकी मुलीने सारा तेंडुलकरने मुंबईचा संघ खरेदी केला आहे. सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई संघाची मालकी मिळवली आहे. जीईपीएल ही जगातील सर्वात मोठ्या ई-क्रिकेट लीगपैकी एक मानली जाते. या लीगचा दुसरा हंगाम 2025 मध्ये होणार आहे. ही लीग रिअल क्रिकेट अॅपवर खेळली जाते. या लीगला इंटरनेटवर 30 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आली आहे.

संघ खरेदी केल्यानंतर सारा तेंडुलकर काय म्हणाली?
जीईपीएलमध्ये मुंबई संघाची मालकी घेतल्यानंतर सारा तेंडुलकर प्रतिक्रिया समोर आली आहे. सारा म्हणाली की "क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटचे भविष्य पाहणे खूप रोमांचक आहे. जीईपीएलमध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. मी माझ्या आवडत्या शहराशी जोडली गेली आहे, ज्यावर मी खूप प्रेम करतो. अशा गुणवत्ता असलेल्या संघासोबत भागीदारी करण्यास मी उत्सुक आहे." आम्ही ही फ्रँचायझी अशा प्रकारे तयार करू की, ती लोकांना प्रेरणा देईल आणि त्यांचे मनोरंजन करेल, असं साराने म्हटलं आहे.
जीईपीएलचे सीईओ आणि लीग कमिशनर रोहित पोटफोडे म्हणाले की, सारा तेंडुलकर मुंबई फ्रँचायझी मालक म्हणून सामील होणे हा जीईपीएलसाठी एक महत्त्वाचा क्षण आहे. साराची उत्साही उपस्थितीमुळे लीगची प्रतिष्ठा वाढेल.
साराचं शिक्षण किती झालं आहे?
सारा तेंडुलकरचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी झाला. तिने आपले शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून पूर्ण केलं आहे. साराने क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. या नव्या जबाबदारीसह सारा तेंडुलकर आता वडिलांच्या सामाजिक कार्यात हातभार ही हातभार लावते. ती अनेकदा सोशल मीडियावर ब्रँड्सची जाहिरात करते.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications