दुबईत राडा! भारतीय बॉक्सर नीरज गोयत भडकला; समोरच्या खेळाडूला सुनावले, 'इंडिया तेरा बाप है', VIDEO

: "रिंगमध्ये भल्याभल्यांना धूळ चारणारा भारताचा स्टार बॉक्सर नीरज गोयत सध्या दुबईत एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. एरवी शांत स्वभावाचा मानला जाणारा नीरज एका परदेशी एथलीटवर असा काही भडकला की त्याचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. वादाचे पर्यावसान शाब्दिक चकमकीत झाले आणि नीरजने भरात 'इंडिया तेरा बाप है' असे सुनावत समोरच्याची बोलती बंद केली. नेमका हा प्रकार काय आहे आणि हा हाय-व्होल्टेज ड्रामा का घडला? वाचा सविस्तर..."

Boxer Neeraj Goyat Viral Video

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये मुक्केबाजी पाहणे सामान्य आहे, मात्र सध्या दुबईत एक असा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. भारताचा प्रसिद्ध बॉक्सर नीरज गोयत याला कारण ठरल्याचे व्हिडिओत दिसते. एका परदेशी खेळाडूशी भिडल्याचे पाहायला मिळत असून, वादादरम्यान त्याने दिलेले चोख प्रत्युत्तर सध्या चर्चेचा विषय आहे.

नेमकी घटना काय?

'वनइंडिया हिंदी'च्या वृत्तानुसार, नीरज गोयत दुबईत आपले ट्रेनिंग संपवून एका मुलाखतीसाठी जात होता. त्याच वेळी एका परदेशी खेळाडूने त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला नीरजने दुर्लक्ष केले, मात्र समोरच्या व्यक्तीने वैयक्तिक टीका आणि अपशब्द वापरण्यास सुरुवात केल्यावर नीरजचा संयम सुटला.

'इंडिया तेरा बाप है'... आणि सर्वत्र शांतता!

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा वाद टोकाला पोहोचला तेव्हा नीरजने आक्रमक पवित्रा घेत समोरच्या खेळाडूला सुनावले की, "इंडिया तेरा बाप है!" हे शब्द ऐकताच समोरचा खेळाडू स्तब्ध झाला. सुदैवाने हा वाद हातापायीपर्यंत पोहोचला नाही आणि नीरज तेथून निघून गेला. सोशल मीडियावर नीरजच्या या 'देशप्रेमी' बाण्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत; काही जण त्याच्या स्वाभिमानाचे कौतुक करत आहेत, तर काही जण संयम राखण्याचा सल्ला देत आहेत.

दुसरीकडे मियामीमध्ये वेगळाच नजारा!

एकीकडे दुबईत तणाव असताना मियामीमध्ये मात्र आनंदाचे वातावरण होते. हेवीवेट चॅम्पियन अँथनी जोशुआ आणि जेक पॉल यांच्यातील सामन्यापूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जोशुआने गंमतीने जेक पॉलची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. या मजेशीर प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+