Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तब्बल 20 वर्षाच्या संसारानंतर मेरी कॉमचा घटस्फोट ? आता एका बिझनेस मॅनच्या प्रेमात ?

Mary Kom Divorce: मेरी कोम ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बॉक्सिंग खेळाडूंपैकी एक आहे. ज्या लोकांनी मेरी कोमची कारकिर्दी जवळून पाहिली आहे, अश्या लोकांना माहित आहे, की तिचा पती करूंग ओंखोलर (ऑनलर) तिला विश्वविजेता बनवण्यात कशी मोठी भूमिका बजावली आहे. त्याच्या दोन लहान मुलांची काळजी घेण्यापासून ते त्यांच्यासोबत प्रवास करण्यापर्यंत तो तिला सतत आधार देत आला आहे. पण आता अश्या बातम्या समोर येत आहेत की, मेरी कोम आणि तिचा पती दोघेही वेगळे होणार आहेत.

मेरी कोमने 2005 साली ऑनलरशी लग्न केलं होतं. आता तब्बल 20 वर्षानंतर त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येत आहे. दोघांकडून अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. पण, लवकरच दोघेही कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पर्ण करून एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

mary kom

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, 2022 मध्ये ओन्लर यांनी राजकारणी म्हणून प्रवास सुरू केल्यापासूनच अडचणी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. त्यांनी मणिपूर विधानसभा निवडणूक लढवली. दोघांमध्ये चांगले संबंध असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीनंतर निर्माण झालेल्या समस्या सोडवता आल्या नाहीत. ते 2022 पासून वेगळे राहत आहेत.

मेरी कोम तिच्या जुळ्या मुलांसह फरिदाबादमध्ये राहत असल्याचीही बातमी आहे. ओन्लर त्याच्या कुटुंबासह दिल्लीत राहतो. "मेरी तिच्या (चार) मुलांसह फरिदाबादला राहत असल्याचं म्हटलं जात आहे तर ऑनलर त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह दिल्लीत राहत आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यातील तणाव वाढला. असं म्हटलं जात आहे की प्रचारादरम्यान सुमारे 2-3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने मेरी नाराज असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान या प्रकरणात आता एक नवीन पैलू समोर आला आहे. आता या घटस्फोटात विवाहबाह्य संबंधांचा संदर्भ जोडला जात आहे. सध्या अश्या अफवा आहे की, मेरी कोम दुसऱ्या बॉक्सरच्या पतीला डेट करत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम फीडवर त्याचे बिझनेस असोसिएट म्हणून फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+