Border Gavaskar Trophy सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का,दुखापतग्रस्त खेळाडू मायदेशी परतला
Border Gavaskar Trophy : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरु होण्याआधीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याचा राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. यश दयाल याआधी दक्षिण आफ्रिकेत भारतीय T20 संघाचा एक भाग होता, पण तिथे तो एकही सामना खेळला नाही. आता खलील अहमदच्या दुखापतीमुळे त्यांच्या जागी राखीव वेगवान गोलंदाज म्हणून यश दयालचा संघात समावेश करण्यात आला आहे.
खलील अहमदला विश्रांती
खलील अहमदला नेटमध्ये गोलंदाजी करण्यात अडचण येत होती. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून तो मायदेशी परतला आहे. यश दयाल जोहान्सबर्गहून थेट पर्थला पोहोचला आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाला सरावासाठी मिचेल स्टार्कसारख्या वेगवान गोलंदाजाचे काम करू शकेल अशा गोलंदाजाची गरज आहे.

यश दयाल यांचा संघात प्रवेश
खलील अहमदला गोलंदाजीत काही अडचण येत असेल तर त्याला संघात राहण्याचे कोणतेही विशेष कारण नाही, त्यामुळे त्याला रिलीज करण्यात आलं आहे, असेही सूत्राने सांगितले. त्यामुळेच खलील अहमदच्या जागी यश दयालचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यश दयाल याला आगामी काळात कसोटी संघात आणखी संधी दिली जाऊ शकते.
यशस्वी जैस्वालही किरकोळ जखम
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत असलेल्या खलील अहमदला रिलीज करण्यात आले असून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कायम ठेवले आहे. याशिवाय मंगळवारी फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालच्या खांद्याला दुखापत झाली होती, मात्र बुधवारी जैस्वाल पुन्हा नेटमध्ये सरावासाठी परतला ही दिलासादायक बाब आहे, जे त्याच्या दुखापतीच्या गंभीरतेबाबत चांगले लक्षण आहे.












Click it and Unblock the Notifications