Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरसीबीचा पाय खोलात, पोलिसांनी केला गुन्हा दाखल, FIRमध्ये कोणाची आहेत नावं

RCB Victory Parade Stampede : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

आरसीबीने 3 जून रोजी पहिले आयपीएल जेतेपद जिंकले होते, त्यानंतर संघाच्या विजय परेडची चर्चा सुरू झाली होती. 4 जूनच्या सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी जमू लागली. गर्दी पाहता पोलिसांनी विजय परेडला परवानगी दिली नाही आणि ती रद्द करण्यात आली.

एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारा उत्सव पुढे ढकलण्याची विनंतीही पोलिसांनी केली होती. त्यांचा असा विश्वास होता की सध्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे, कारण संघाने फक्त एक दिवस आधी ट्रॉफी जिंकली आहे.

bengaluru stadium stampede Update

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरसीबीने हा कार्यक्रम आयोजित करावा अशी पोलिसांनी आधीच सूचविले होते.ड परंतु आरसीबीचा युक्तिवाद होता की त्यांचे परदेशी खेळाडू त्यांच्या देशात परततील, म्हणून त्यांना 4 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करावा लागणार आहे.

बंगळुुरू शहराचे उपायुक्त जी. जगदीश यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पोलिस आयुक्त बी दयानंद यांना चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीत सामील होण्यासाठी नोटीस बजावल्या जातील.

बुधवारी जिथे चेंगराचेंगरी झाली त्या चिन्नास्वामी स्टेडियमची पाहणी केली. बुधवारी (4 जून २०२५) बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 50 हून अधिक लोक जखमी झाले.

यांच्यावर गुन्हा दाखल, ही लागली कलम

आरसीबी, डीएनए (इव्हेंट मॅनेजर), कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्याविरुद्ध क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चेंगराचेंगरीच्या घटनेत गुन्हेगारी निष्काळजीपणाचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये कलम 105, 125 (1) (2), 132, 121/1, 190 आर/डब्ल्यू 3 (5) लावण्यात आले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+