Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कर्णधार सूर्यकुमार यादव 3 महिन्यांत 2 वेळा साईचरणी लीन; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा वाढल्या

टीम इंडियाचा टी-२० संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने आज शिर्डीत येत साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानने त्याचा पोस्ट केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना ही बातमी समजली. यापूर्वी जानेवारी महिन्यांत सूर्याने साईसमाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका सुरु होणार होती. आता आयपीएल-२०२५ सुरु होणार आहे. त्यापूर्वी सूर्याने साईबाबांचे दर्शन घेतले. सूर्या जिंकण्यासाठीच बाबांचा आशीर्वाद घ्यायला येतो, अशा चर्चा त्याच्या चाहत्यांमधून सुरु झाल्या आहेत.

Suryakumar Yadav s Saidarshan

तीन महिन्यांत दोनदा शिर्डीत

टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देवीशा शेट्टी यांनी आज साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. मदिर समितीने या दाम्पत्याचा व्हिडीओ पोस्ट केला. दोघांनीही समाधीमंदीरात पूजा केली. त्यानंतर या दोघांनी मंदीर परिसरात अनेक चाहत्यांना भेटी दिल्या. सूर्या आणि देवीशा शेट्टी या दोघांना दर्शनानंतर मंदिर समितीकडून सम्मानित करण्यात आले. शिर्डीत येण्याची सूर्याची ही गेल्या 3 महिन्यांतील दुसरी वेळ आहे. याआधी जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेआधी सूर्याने साईबाबांच दर्शन घेतलं होतं.

आयपीएलपूर्वी घेतले आशिर्वाद

आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबईचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने सूर्याला मेगा ऑक्शनआधी करारमुक्त न करता कायम ठेवले होते. मुंबईने सूर्यासाठी 16 कोटी 35 लाख रुपये मोजले आहेत. या स्पर्धेपूर्वी सूर्यकुमारने आज साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

सूर्या आयपीएलचा हिरो

सूर्यकुमार यादवला आयपीएलचा अनुभवी खेळाडू समजले जाते. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच सूर्यकुमारने भारतीय संघात प्रवेश केला होता.सूर्याने आयपीएलमध्ये मुंबईकडून 6 एप्रिल 2012 रोजी पुण्याविरुद्ध पदार्पण केलं होते. सूर्याने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 150 सामने खेळले आहेत. सूर्यकुमारने या 150 पैकी 106 सामन्यांत मुंबईचं प्रतिनिधित्व केले आहे. सूर्याने आयपीएल कारकीर्दीत 32.08 च्या सरासहीने 3 हजार 594 धावा केल्या आहेत. सूर्याने या दरम्यान 24 अर्धशतकं आणि 2 शतकं झळकावली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+