क्रिकेटच्या महाकुंभाचा दिमाखदार सोहळा! दिग्गज खेळाडूंना 'जीवनगौरव'; कुणाला कोणता पुरस्कार? वाचा यादी
Bcci naman awards 2026 full winners list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज दिल्लीत आयोजित 'नमन पुरस्कार २०२६' सोहळ्यात क्रिकेट विश्वातील दिग्गज आणि नव्या ताऱ्यांचा गौरव केला. भारतीय क्रिकेटचे 'द वॉल' राहुल द्रविड, माजी अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटची आयकॉन मिताली राज यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, एकाच वर्षात ५ आयसीसी (ICC) ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघांच्या ऐतिहासिक कामगिरीचेही यावेळी जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.

BCCI नमन पुरस्कार २०२६: विजेत्यांची संपूर्ण यादी
जीवनगौरव पुरस्कार (Lifetime Achievement Awards)
- कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार: रॉजर बिन्नी
- कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार: राहुल द्रविड
- बीसीसीआय महिला जीवनगौरव पुरस्कार: मिताली राज
आंतरराष्ट्रीय क्रिकेट (२०२४-२५ हंगाम)
- पॉली उम्रीगर पुरस्कार (सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू): शुभमन गिल
- सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू: स्मृती मानधना
- महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा: स्मृती मानधना
- महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स: दीप्ती शर्मा
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (पुरुष): हर्षित राणा
- सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण (महिला): एन. श्री चराणी
- स्थानिक आणि कनिष्ठ क्रिकेट पुरस्कार
माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी):
- सर्वाधिक धावा (एलिट): वाय. व्ही. राठोड (विदर्भ)
- सर्वाधिक विकेट्स (एलिट): हर्ष दुबे (विदर्भ)
- सर्वाधिक धावा (प्लेट): स्नेहल कौठणकर (गोवा)
- सर्वाधिक विकेट्स (प्लेट): सुचित जे. (नागालँड)
लाला अमरनाथ पुरस्कार:
- सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (स्थानिक मर्यादित षटके): आयुष म्हात्रे (मुंबई)
- सर्वोत्कृष्ट अष्टपैलू (रणजी ट्रॉफी): हर्ष दुबे (विदर्भ)
जगमोहन दालमिया ट्रॉफी (महिला व कनिष्ठ गट):
- सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (ज्युनिअर डोमेस्टिक): ईरा जाधव (मुंबई)
- सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू (सीनिअर डोमेस्टिक): शेफाली वर्मा (हरियाणा)
विजय मर्चंट ट्रॉफी (U16)
- सर्वाधिक धावा: शंतनू सिंह (उत्तर प्रदेश)
- सर्वाधिक विकेट्स: यशवर्धन सिंह चौहान (मध्य प्रदेश)
एम.ए. चिदंबरम ट्रॉफी (U19 व U23):
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी (U23) सर्वाधिक धावा: मॅकनील एच.एन. (कर्नाटक)
- कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी (U23) सर्वाधिक विकेट्स: विकी ओस्तवाल (महाराष्ट्र)
- कूच बिहार ट्रॉफी (U19) सर्वाधिक धावा: नित्य जे. पंड्या (बडोदा)
- कूच बिहार ट्रॉफी (U19) सर्वाधिक विकेट्स: हेमचुडेशन जे. (तमिळनाडू)
इतर पुरस्कार:
- सर्वोत्कृष्ट अंपायर (स्थानिक क्रिकेट): उल्हास गांधी (विदर्भ)
- सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी असोसिएशन: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA)
- दिलीप सरदेसाई पुरस्कार: (या काळात भारत-विंडीज कसोटी नसल्याने रिक्त)
More From
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications