BCCI कडून मोठी घोषणा; खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर, कुणाची निवड, कोणती श्रेणी, किती देणार पैसे? वाचा
सध्या भारतात आयपीएलचा थरार रंगला आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने 2024-25 या वर्षासाठी महिला क्रिकेट टीमसाठी वार्षिक कराराची घोषणा केली. या वार्षिक करारात एकूण 16 खेळाडूंचा समावेश आहे. या 16 खेळाडूंना 3 श्रेणीत विभागण्यात आलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.

फक्त तिघींना ए ग्रेड
बीसीसीआयने जाहीर केलेल्या १६ खेळाडूंच्या लिस्टमध्ये फक्त तिघींना ए ग्रेडमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यात कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. बी ग्रेडमध्ये 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरित 9 खेळाडूंना सी ग्रेडमध्ये निवडण्यात आलं आहे. हा करार 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे.
🚨 News 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) March 24, 2025
BCCI announces annual player retainership 2024-25 - Team India (Senior Women)#TeamIndia pic.twitter.com/fwDpLlm1mT
कुणाला कोणती श्रेणी?
बीसीसीआयकडून ए ग्रेडमध्ये तिघी तर बी श्रेणीत रेणुका ठाकुर, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष आणि शफाली वर्मा या चौघींचा समावेश आहे. तर यास्तिका भाटीया, राधा यादव, श्रेयांका पाटील, तितास साधू, अमनज्योत कौर, उमा छेत्री, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकार यांना सी ग्रेडमध्ये संधी मिळाली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
किती देणार पैसे?
बीसीसीआय ए ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 50 लाख रुपये देणार आहे. बी ग्रेडमधील खेळाडूंना 30 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर सी ग्रेड खेळूडंना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. बीसीसीआयकडून महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना सामन्यासाठी समान रक्कम देते. मात्र हाच न्याय वार्षिक करारबाबत नाही. महिला आणि पुरुष खेळाडूंना वार्षिक करारानुसार मिळणाऱ्या रक्कमेत फार तफावत आहे. पुरुष क्रिकेटपटूंना ए प्लस, ए, बी आणि श्रेणी अशा 4 श्रेणीनुसार अनुक्रमे 7,5,3 आणि 1 कोटी दिले जातात.












Click it and Unblock the Notifications