चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी स्टीव्ह स्मिथने केला मोठा पराक्रम, या बाबतीत दिग्गज खेळाळडूंना टाकले मागे
Steve Smith : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार फलंदाजी करत एक मोठा विक्रम केला आहे. गॉलमध्ये सुरु असलेल्या मालिकेत स्मिथने श्रीलंकेविरुद्ध आणखी एक शतक झळकावत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मिथने 191 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं आहे.
श्रीलंका दौऱ्यावर स्मिथने सलग दुसरे शतक झळकात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत राहुल द्रविड आणि जो रूट यांच्याशी बरोबरी केली आहे. स्टीव्ह स्मिथचे हे 36 वे कसोटी शतक आहे. सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत तो आता पाचव्या क्रमांकावर आहे.

कसोटी क्रिकेटमधील स्मिथचे हे 36 वे शतक आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये आपलं वर्चस्व मिळवलं आहे. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत 17 शतके झळकावली आहेत तर आशियामध्ये सात शतके झळकावली आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचा उत्कृष्ट फॉर्म संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पुरेसा ठरणार आहे.
स्मिथने 42 डावांमध्ये हा विक्रम केला.
सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून स्मिथने पॉन्टिंगचा 1,889 धावांचा मागील विक्रम मोडून ही कामगिरी केली. विशेष म्हणजे स्मिथने 51 पेक्षा जास्त सरासरीने केवळ 42 डावांमध्ये हा विक्रम गाठला आहे.
सर्वात कमी डावांमध्ये 36 शतके ठोकण्याच्या बाबतीत स्मिथने सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. कमी डावांमध्ये 36 शतके करणारा रिकी पॉन्टिंग हा एकमेव फलंदाज आहे. पॉन्टिंगने 200 डावांमध्ये 36 वे शतक ठोकले आहेत तर स्मिथने 206 डावांमध्ये 36 वे शतक ठोकलं आहे. त्यानंतर कुमार संगकारा 210 डावात तर सचिन तेंडुलकर 218 चा क्रमांक लागतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंची यादी
सचिन तेंडुलकर (भारत) - 51
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 45
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) - 41
कुमार संगकारा (श्रीलंका) - 38
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 36
जो रूट (इंग्लंड) - 36
राहुल द्रविड (भारत) - 36












Click it and Unblock the Notifications