Australia vs South Africa : ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिकेत सामना, जाणून घ्या वेळ आणि कुठे बघाल मॅच?
Australia vs South Africa live streaming : चॅम्पियन ट्राॅफीत ग्रुप अ मध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेश संघ सेमीफायनलमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील असतानाच आता 25 फेब्रुवारीला 2025 ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका संघात हायहोल्टेज सामना होणार आहे. या सामन्याची क्रीडा रसिकांना उत्सकता आहे कारण या दोन संघातून सेमीफायनलमध्ये कोण पोहचणार याचा अंदाजही लागणार आहे.
दुसरी गोष्ट विचारात घेता ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सर्वात जास्त रन चेस करणारा संघ ठरला आहे. इंग्लडविरुद्ध 352 धावांचे आव्हान कांगारुंनी सहज पार केले. त्यामुळे या संघाचा आत्मविश्वास अगदी शिखरावर आहे तर दुसरीकडे दक्षिण आफ्रीकन संघ विजयासाठी उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेने कराचीमध्ये अफगाणिस्तानचे आव्हान मोडून काढले.

मंगळवारी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप बी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी स्पर्धेतील त्यांचे सुरुवातीचे सामने जिंकले आणि सलग दुसरा विजय त्यांना उपांत्य फेरीच्या जवळ नेईल. रावळपिंडीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ग्रुप बी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येईल याची माहिती आपण जाणून घेऊया.
'या' आस्ट्रेलियन अनुभवी खेळाडूची कमतरता
दक्षिण आफ्रिकेला उद्या विजयाची मोठी संधी आहे. कारण ऑस्ट्रेलिया त्यांच्या अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्याशिवाय खेळण्याची शक्यता आहे. हा मॅच अत्यंत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे येथे..
चॅम्पियन ट्राॅफीतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामना कधी खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामना मंगळवारी 25 फेब्रुवारी 2025 रोजी खेळला जाईल. हा सामना दुपारी 2:30 वाजता भारतीय वेळेनुसार सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी 2 वाजता होईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे खेळला जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामना कोणत्या चॅनेलवरून प्रसारित केले जाईल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जाईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे उपलब्ध असेल?
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रुप बी सामन्याचेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ-हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Australia vs South Africa ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ
ऑस्ट्रेलिया संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), सीन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन, ॲरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, ॲडम शॉर्ट. प्रवास राखीव: कूपर कोनोली
दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, बॉसिंग कॉर्बिन, रॅसी. राखीव: केवीना मॅपहाका












Click it and Unblock the Notifications