रोहित-विराटनंतर 'या' आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूने वनडेमधून घेतली निवृत्ती, वाचा त्याच्याविषयी
australia cricketer glenn maxwell ODI retirement : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू तथा आयपीएलमधील आय़पीएलचा तुफानी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
मॅक्सवेल 2015 आणि 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. मॅक्सवेलने हा निर्णय विशेषतः 2026 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषक लक्षात घेऊन घेतला आहे, ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियासाठी विजेतेपद मिळविण्यासाठी अधिक तयारी करत आहे. चला तर जाणून घेऊया या ग्लेन मॅक्सवेलने वनडे तून का घेतली निवृत्ती आणि त्याने क्रिकेट विश्वात काय दिले योगदान.

वनडेमधून निवृत्तीवर मॅक्सवेल काय म्हणाला?
36 वर्षीय असलेला प्लेअर ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या एकदिवसीय निवृत्तीबद्दल फायनल वर्ड पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांने मोठा खुलासा केला. तो म्हणाला की, मी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाबद्दल निवडकर्त्यांशी बोललो, मला वाटत नाही की मी ते करू शकेन. मला फक्त काही मालिकांपर्यंत मर्यादित राहायचे नव्हते आणि माझ्या स्वार्थासाठी खेळायचे नव्हते.
ग्लेन मॅक्सवेल म्हणतो, 'सुरुवातीला मला अनपेक्षितपणे संघात निवडण्यात आले. त्यानंतर 'बाहेर पडणे, पुनरागमन करणे, विश्वचषक खेळणे आणि काही सर्वोत्तम संघांचा भाग असणे. मला असे वाटू लागले की माझ्या शरीराची प्रतिक्रिया आता संघासाठी योग्य नाही.
ऑस्टेलिया क्रिकेटचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्याशी बोललो आणि त्यांना पुढे जाण्याबाबत काय वाटते ते विचारले. संघ स्पष्ट दिशेने वाटचाल करत आहे आणि या निर्णयामुळे त्यांना पुढील विश्वचषकापूर्वी योग्य संयोजन तयार करण्यास मदत होणार आहे.
विश्वचषकात संस्मरणीय खेळी
- उजव्या हाताचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.81 च्या सरासरीने 3,990 धावा केल्या आहेत.
- या दरम्यान, त्याच्या बॅटमधून 4 शतके आणि 23 अर्धशतके आली आणि त्याचा स्ट्राइक रेट 1226.70 होता. मॅक्सवेलने 47.32 च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यांमध्ये 77 बळीही घेतले.
पायाला दुखापत होती, पण संघासाठी त्याने रक्ताचं पाणी केलं
- मॅक्सवेलने एकदिवसीय सामन्यांमध्ये अशा खेळी खेळल्या की नेहमीच लक्षात राहतील. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात, वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धावसंख्या 7 विकेटच्या मोबदल्यात 91 धावांवर पोहोचला तेव्हा मॅक्सवेलने जबाबदारी स्वीकारली आणि पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही, एक अविश्वसनीय खेळी खेळली आणि कांगारू संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
- त्या सामन्यात मॅक्सवेलने 128 चेंडूत 201* धावा केल्या, ज्यामध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. त्या काळात, मॅक्सवेलने कर्णधार पॅट कमिन्स (12*) सोबत आठव्या विकेटसाठी 202* धावांची भागीदारी करून संघाला 292 धावांचे लक्ष्य गाठले. नंतर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून 2023चा एकदिवसीय विश्वचषक देखील जिंकला होता.
मॅक्सवेलच्या कामगिरीवर टाका नजर
- 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ग्लेन मॅक्सवेल हा दोन वेळा विश्वचषक विजेता आहे. त्याने 149 एकदिवसीय सामन्यांमध्ये जवळपास 4,000 धावा केल्या आहेत, तर गोलंदाज म्हणून त्याने 79 बळी घेतले आहेत.
- जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा तो एका योग्य फलंदाजासारखा दिसत होता आणि जेव्हा तो गोलंदाजी करत होता तेव्हा तो एका योग्य ऑफ-स्पिनरसारखा दिसत होता.












Click it and Unblock the Notifications